Home | Business | Industries | 20,900 crore loan to MSME sector

एमएसएमई क्षेत्राला 20,900 कोटी कर्ज; वित्त सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली माहिती 

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 09:55 AM IST

३९ जिल्ह्यांशी संबंधित या एमएसएमईला ६,५०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

  • 20,900 crore loan to MSME sector

    नवी दिल्ली- केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राला मदत करण्यासाठी १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत १०४ जिल्ह्यांमध्ये २०,९०० कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. एकूण ३३ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामधील ६.३६ लाख एमएसएमई वस्त्रोद्योग क्षेत्रातील आहेत. ३९ जिल्ह्यांशी संबंधित या एमएसएमईला ६,५०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. वित्त सेवा सचिव राजीव कुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली.

    एमएसएमईची मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० दिवसांचा हा कार्यक्रम मागील वर्षी दोन नोव्हेंबर रोजी सुरू केला होता. त्याचबरोबर त्यांनी एमएसएमईसाठी १२ महत्त्वपूर्ण उपायांची ही घोषणा केली होती. यामध्ये जीएसटीमध्ये नोंदणी असलेल्या एमएसएमईला विशेष पोर्टलच्या माध्यमातून एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर करणे आणि याच मर्यादेच्या आत अतिरिक्त कर्जावर व्याजात २ टक्के सूट यांचा समावेश आहे.

Trending