आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० वे शिखर संमेलन : अंतर्गत मुद्द्यावर बाह्य हस्तक्षेप सहन करणार नाही - पंतप्रधान मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी पुतीन यांच्यासोबत ज्वेज्दा यार्ड प्रकल्पाच्या कॅम्पसला बुधवारी भेट दिली. - Divya Marathi
मोदींनी पुतीन यांच्यासोबत ज्वेज्दा यार्ड प्रकल्पाच्या कॅम्पसला बुधवारी भेट दिली.

व्लादिव्हाेस्ताेक - देशाच्या अंतर्गत प्रश्नी इतर देशांचा हस्तक्षेप मुळीच सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता इशारा दिला आहे. माेदी दाेनदिवसीय रशिया दाैऱ्यावर असून बुधवारी माेदी-पुतीन यांच्यात व्यापार, गुंतवणूक, तेल, गॅस, अणुऊर्जा, संरक्षण, अंतराळ यासह सागरी संपर्क क्षेत्रात भागीदारीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. 

द्विपक्षीय चर्चेनंतर माेदी पत्रकार परिषदेत म्हणाले,  माझे मित्र व्लादिमीर पुतीन व मी देशांतर्गत प्रश्नी इतर देशांच्या हस्तक्षेपाला कदापिही स्वीकारणार नाही. भारत-रशिया यांच्यातील मैत्रीची पातळी अधिक दृढ हाेत चालली आहे. दाेन्ही देशांतील विशेष तसेच सामरिक भागीदारी त्यात महत्त्वाची मानली जाते. या भागीदारीतून दाेन्ही देशांतील जनतेला विविध क्षेत्रांतील लाभ हाेतील. ही भागीदारी सहकार्य व पाठिंब्याच्या बळावर वाटचाल करत आहे. व्यापार व गुंतवणुकीच्या क्षेत्रात दाेन्ही देशांनी आपले प्राधान्यक्रम िनश्चित केले आहेत. पंतप्रधानांना ‘आॅर्डर आॅफ अँड्र्यू द अप्साॅटल’ पुरस्कार जाहीर झाला. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी मोदी यांना मे २०२० मध्ये होणाऱ्या दुसऱ्या महायुद्धाच्या ७५ व्या विजय दिन समारंभात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
 

सागरी मार्ग : चेन्नई ते व्लादिवोस्तोकला जाण्यास ४० ऐवजी २४ दिवस लागणार
चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी मार्ग १०४९५ किमी लांबीचा असेल. या प्रकल्पामुळे भारताचा उत्तर-पूर्व आशिया व पश्चिम प्रशांत क्षेत्राशी जोडला जाईल. सध्या मालवाहू जहाजाला चेन्नईहून व्लादिवोस्तोकपर्यंत जाण्यासाठी सुमारे ४० दिवस लागतात. त्यासाठी सामान्यपणे युरोपीय क्षेत्रातील मार्गाचा अवलंब करावा लागतो. नवीन सागरी मार्ग सुरू झाल्यानंतर हे अंतर २४ दिवसांत पूर्ण करता येईल.
 

व्यापार : यंदा भारत-रशियाचा व्यापार १७ टक्क्यांहून ७९ हजार ३२० कोटींवर 
रशियाचे राष्ट्रपती पुतीन म्हणाले, भारत व रशियाचा द्विपक्षीय व्यापार १७ टक्क्यांहून ७९ हजार ३२० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी रशियाने भारताला ३३ टन तेल पाठवले होते. त्याशिवाय ५५० टन तेल उत्पादन, ४५ लाख टन कोळसा पाठवण्यात आला.  
 

सन्मान : २१ वर्षांत जिनपिंग यांच्यासह १५ जणांचा सर्वोच्च पुरस्काराने गौरव
‘ द ऑर्डर ऑफ सेंट अँड्ऱ्यू द एपोस्टल’ ची सुरुवात १६६८ मध्ये झाली. परंतु रशिया सरकारने त्यास १९९८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून आतापर्यंत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह १५ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या पंक्तीत आता मोदी यांचाही समावेश झाला आहे.