आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा.. सहावी ते आठवीतील 21 विद्यार्थिनींचा मुख्याध्यापकाने केला लैंगिक छळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव- तालुक्यातील जरंडी येथील प्राथमिक शाळेतील तीन वर्गांतील तब्बल २१ किशोरवयीन विद्यार्थिनींचा मुख्याध्यापकाकडून अश्लील भाषा वापरून आठवडाभरापासून लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 


सहावी ते आठवी या तीन वर्गांतील २१ विद्यार्थिनींना मुख्याध्यापक अश्लील भाषा वापरून त्यांच्याशी आक्षेपार्ह वागत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी पालकांकडे केली. त्यामुळे पालकांनी मंगळवारी थेट शाळा गाठली. हा प्रकार खरा असल्याचे पुनश्च विद्यार्थिनींनी सांगितल्यावरून विष्णू वाघ, गोविंद राठोड यांनी सोयगाव पोलिसांत तक्रार दिली. गटविकास अधिकारी एम.सी. राठोड,गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे यांनी तातडीने शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष २१ विद्यार्थिनींचा जबाब घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...