आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विकास घोटाळ्याप्रकरणी अखेर 21 कनिष्ठ कर्मचारी निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : आदिवासी विकास गैरव्यवहारप्रकरणी गायकवाड समितीच्या चौकशी आयोगाच्या अहवालाच्या आधारावर आदिवासी विकास खात्याने राज्यातील २१ कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि खात्यांतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २३ जानेवारीपर्यंत ही कारवाई करून त्याचा अहवाल मुंबईस पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, तीन वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ चौकशीनंतर केवळ कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर १० फेब्रुवारीची मुदत देण्यात आल्याने आदिवासी विकास खात्यातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.

सन २००४ ते २००९ दरम्यान आदिवासींसाठीच्या योजनेतील अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निवृत्त न्यायमूर्ती एम. गायकवाड यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने तीन वर्षे चौकशी करून पाच खंडांचा अहवाल सादर केला होता.

अधिकारी-कर्मचारी पुढीलप्रमाणे 


१. एस. जी. भोये, आदिवासी विकास निरीक्षक, सोलापूर
२. एस. एस. पटेकर, संशोधन सहायक, पेण
३. वाय. एस. भोये, आदिवासी विकास निरीक्षक, जव्हार
४. डी. डी. नवटे, आदिवासी विकास निरीक्षक, नंदुरबार
५. व्ही. ए. संख्ये, आदिवासी विकास निरीक्षक, डहाणू
६. नितांत कांबळे, कार्यालय अधीक्षक, ए.आ.वि.प्र. जव्हार
७. धनंजय जाधव, कार्यालय अधीक्षक, घोडेगाव
८. व्ही. आर. बोरगावकर, आदिवासी विकास निरीक्षक, शहापूर
९. पी. एस. गायकवाड, उपलेखापाल, जव्हार
१०. आर. आर.गवळी, लघुटंकलेखक, जव्हार
११. दीपक दळवी, वरिष्ठ लिपिक, पेण
१२. डी. एल. घुगे, वरिष्ठ लिपिक, धुळे
१३. डी. एन. डोरकुले, वरिष्ठ लिपिक, पुसद
१४. विक्रम पाटील, वरिष्ठ लिपिक, जव्हार
१५. एस. ए. अहेर, वरिष्ठ लिपिक, औरंगाबाद
१६. पी. एस. चव्हाण, वरिष्ठ लिपिक, जव्हार
१७. एम. एन. कोडापे, कनिष्ठ लिपिक, नागपूर
१८. बी. यू. शेळके, कनिष्ठ लिपिक, शहापूर
१९. पी. पी. बरोरा, कनिष्ठ लिपिक, शहापूर
२०. के. बी. भुसारे, प्रयोगशाळा परिचर, नांदगाव
२१. एच. जी. हांबरे, शिपाई, आदिवासी मुलांचे शासकीय आश्रमशाळा, खोडाळा.

आदिवासी विकास विभागात १३ कोटींचा अपहार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा

नंदुरबार : येथील आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत तेल पंप, डिझेल पंप व घरगुती गॅस वाटपात झालेल्या १२ कोटी ९४ लाख २४४ रुपयांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह वीज तंत्रज्ञ व कामगार संस्थेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेले तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक संभाजी राघो कोळपे (रा. बोराडी, ता. शिरपूर), वीज तंत्रज्ञ गोकुळ रतन बागुल (रा. फुले कॉलनी, शेवगे, ता. साक्री), आकाशदीप विद्युत कामगार संस्थेचे अध्यक्ष अरुण शिवलाल कोकणी, गिरीश उदेसिंग परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.