आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Drink Drive प्रकरणी तरुणीला केली अटक, मग तुरुंगात काढली विवस्त्र धिंड; मग घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडिनबर्ग - तुरुंगात पोलिसांच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली असा खुलासा पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी तुरुंग प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली. कॅटी अॅलन हिने स्कॉटिश तुरुंगात शिक्षा सुरू असताना जून महिन्यात आत्महत्या केली. तत्पूर्वी तिच्यासोबत तुरुंगात काय-काय घडले याचा संपूर्ण खुलासा केटीच्या आई-वडिलांनी केला आहे. कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांनी या मुलीचे कपडे काढून वारंवार चौकशी केली. एवढेच नव्हे, तर जेलमध्ये तिची विस्त्र धिंड सुद्धा काढण्यात आली होती. असा पालकांचा आरोप आहे. 


ड्रिंक ड्राइव्हमुळे झाली होती 16 महिन्यांची कैद
- केटीने फेब्रुवारी महिन्यात मद्यधुंद अवस्थेत एका 15 वर्षीय मुलाला धडक दिली होती. यात तो जखमी झाला होता. यानंतर तिने पळून जाण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्ट बिन आणि कुंड्यांचे नुकसान केले होते. घटनास्थळावरून पसार होत असताना स्थानिकांनी तिच्या कारचा फोटो पोलिसांना दाखवला होता. वाहन क्रमांकावरून तिचा पत्ता लागला आणि त्याचवेळी केटीला अटक करण्यात आली. केटी अॅलन ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह, घटनास्थळावरून पळून जाणे आणि जखमी करणे इत्यादी प्रकरणी कोर्टाने 16 महिन्यांची कैद सुनावली होती. 
- केटीने ज्या 15 वर्षीय मुलाला जखमी केले होते, तो लवकरच बरा झाला. केटीला न्यायालयात हजर केले असता पीडित मुलाच्या आई-वडिलांनी केटीला माफ केले होते. तसेच तिला शिक्षा देऊ नये असे आवाहन सुद्धा त्यांनी न्यायालयात केले होते. तरीही पोलिसांच्या तपास अहवालाचा दाखला देत कोर्टान तिला शिक्षा सुनावली. तुरुंगात गेल्यानंतरही केटीने त्या जखमी मुलाच्या कुटुंबियांना पत्र लिहून माफी मागितली होती. केटीला शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा नव्हती. त्यातही तिने आत्महत्या केली हे वृत्त आमच्यासाठी धक्कादायक आहे असे त्या जखमी मुलाच्या आईने सांगितले. 


तुरुंगात नेमके काय घडले?
केटीची आई लिन्डा (51) आणि वडील स्टेवर्ट (54) यांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येसाठी स्कॉटिश प्रिझन सर्व्हिसला जबाबदार धरले आहे. तुरुंग प्रशासनाने तिच्यावर अत्याचार केले नसते तर आमची मुलगी केटी आज जिवंत असती असे ते म्हणाले. केटी आई लिन्डा सांगते, केटीला तुरंगात डांबण्यात आले तेव्हापासूनच तुरुंग अधिकाऱ्यांनी तिच्या सभ्यपणाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. ती आपल्या वरिष्ठांचे नेहमीच ऐकायची आणि तुरुंग अधिकारी तिची थट्टा मस्करी करून तिला अनावश्यक कामे लावत होते. चौकशीच्या नावाने विनाकारण पोलिस तिचे कपडे काढून चाचपणी करायचे. 


एकदा तर हद्दच पार केली... 
> लिन्डाने सांगितल्याप्रमाणे, एक दिवस तुरुंगात नवीन अधिकारी ट्रेनिंगसाठी आले होते. त्यावेळी त्यांना विवस्त्र करून चाचपणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक सादर करायचे होते. त्यांनी यासाठी कैद्यांमधून मुद्दाम केटीची निवड केली. सर्वांसमोर तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढले. काहींनी तिची चाचपणी करण्यास सुरुवात केली. सगळेच तिच्या अंगाला हात लावत होते. यानंतर प्रात्यक्षिक संपले तरी तिला कपडे घालण्यास मज्जाव केला. या दरम्यान अधिकारी एकमेकांशी गप्प मारत बसले आणि तिला तसेच विवस्त्र अवस्थेत थांबवण्यात आले होते.
> तुरुंगातील कैद्यांना सुद्धा बाहेरून ती नग्न असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. यानंतर तुरुंग प्रशासने तिची तुरुंगात नग्न धिंड काढून थट्टा केली. प्रशासकीय अधिकारीच केटीवर अत्याचार करत असल्याचे पाहता कैद्यांची हिंमत वाढली होती. तिच्यासोबत तुरुंगात असलेले इतर कैदी सुद्धा तिचा छळ करत होते. जून महिन्यात या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. तुरंग प्रशासनाने आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच कुठल्याही प्रकारचा तपास झाल्यास आपले सहकार्य राहील असे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...