आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय मनीषा प्रथमच रिंगमध्ये; पदकविजेत्या क्रिस्टियानाला नमवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताच्या प्रतिभावंत २१ वर्षीय मनीषा माेनने महिलांच्या जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमधील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने अापल्या वजन गटाच्या सलामी सामन्यातच धडाकेबाज विजयाची नाेंद केली. तिने पहिल्या फेरीत दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या क्रिस्टीना क्रुजला पराभूत केले.

 

तिने ५-० अशा फरकाने सलामीला एकतर्फी विजयाची नाेंद केली. यामुळे तिला अागेकूच करता अाली. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेच्या रिंगमध्ये उतरलेल्या या युवा बाॅक्सरने ३६ वर्षीय अनुभवी क्रिस्टिनाला जबरदस्त ठाेसे लगावत पराभूत केले. क्रिस्टिना ही २०१६ अाणि २०१२ च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती खेळाडू अाहे. मात्र, तिलाही या लढतीत प्रत्युत्तराची संधीच मिळाली नाही. त्यामुळे तिला पराभवाचा सामना करावा लागला. अाता विजयाने मनीषाचा स्पर्धेत दबदबा निर्माण झाला. याशिवाय तिने भारताच्या पदकाच्या अाशाही पल्लवित केल्या.   


दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडाेअर स्टेडियममध्ये या जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेला सुरुवात झाली. अापल्या घरच्या मैदानावरील या स्पर्धेत यजमान भारताच्या मनीषाने सलामीलाच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच स्पर्धेत पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी काेमही अापले काैशल्य पणास लावणार अाहे. तिच्याही फाइटवर सर्वांचे लक्ष असेल. अाता सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा तिचा मानस अाहे. तिचाही या स्पर्धेतील पदकाचा दावा मजबुत मानला जात अाहे. घरच्या मैदानावरील या स्पर्धेत भारताचे खेळाडू चमकण्याचे चित्र अाहे.  

 

विजयाचा अानंद माेठा : मनीषा
पहिल्यांदाच मी या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत खेळत अाहे. त्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची गाेष्ट अाहे. मात्र, त्यापेक्षाही चाहत्यांच्या अपेक्षांचाही दबाव अाहे. अाता क्रिस्टिनाविरुद्धच्या विजयाने माझा अात्मविश्वास द्विगुणीत झाला. यासाठी घेतलेल्या मेहनतीचे मला फळ मिळाले. यासाठी तयार केलेल्या डावपेचाही मला माेठा फायदा झाला. यातून हा एकतर्फी विजय साकारता अाला. या विजयाचा अानंद हा माझ्यासाठी सर्वात माेठा अाहे, अशी प्रतिक्रीया मनीषाने विजयानंतर दिली.  

 

असा मिळवला विजय; पाचही जजचे मिळाले गुणांकन
भारताच्या मनीषाने ५४ किलाे वजन गटाच्या सलामीला एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने क्रिस्टिनाविरुद्ध सरस खेळी केली. त्यामुळे तिला लढतीत २९-२८, ३०-२७, ३०-२६, ३०-२६, २९-२८ अशा फरकाने विजय संपादन करता अाला. यादरम्यान तिला पाचही पंचांनी अशा प्रकारे गुणांकन दिले. तिने अाक्रमक अाणि सुरेख संरक्षणात्मक काैशल्याच्या अाधारे ही फाइट जिंकली. तिने सुरुवात डिफेन्सिव्ह खेळीने केली. त्यामुळे अनुभवी क्रिस्टिनाची झुंज सपशेल अपयशी ठरली.

 

मेरी काेम अाहे प्रबळ दावेदर
भारताची अनुभवी बाॅक्सर मेरी काेम अाता यंदाच्या घरच्या मैदानावरील या स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार मानली जाते. तिला याच्या माध्यमातून नव्या विक्रमाचीही संधी अाहे. मेरी कोम अव्वल तीनमध्ये  राहिल्यास या स्पर्धेत सात पदके जिंकणारी जगातील पहिली खेळाडू ठरणार अाहे. स्पर्धेत भारताचे १० खेळाडू सहभागी झाले. 

 

उद्या डिनाचे अाव्हान; मनीषाचे वर्चस्व 
भारताच्या युवा बाॅक्सर मनीषाची नजर अाता सुवर्णपदकाकडे लागली अाहे. तिला अाता प्री-क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन डिनाच्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे. तरीही यातील विजयाचे मनीषाचे पारडे जड मानले जाते. कारण, गत महिन्यात पाेलंड येथील सिलिसियन अांतरराष्ट्रीय बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये डिनाला पराभूत केले हाेते. यामुळे अाता याच विजयाचा कित्ता पुन्हा गिरवण्याचा तिचा प्रयत्न असेल.   

 

 

बातम्या आणखी आहेत...