आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी कुटुंबियांसमोर रचले स्वतःच्या अपहरणाचे खोटे नाट्य, असे पकडले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूरमध्ये एका तरुणीच्या अपहरण प्रकरणाला बुधवारी नाटकीय वळण लागले. गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी संध्याकाळी 8 वाजता पालकांनी आपल्या तरुण मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये 4 जणांनी मुलीचे अपहरण केले असे सांगण्यात आले होते. पोलिसांनी वेळीच तपास सुरू केला आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, बुधवारी सत्य समोर आले तेव्हा कुटुंबियांसह पोलिस सुद्धा धक्काच बसला.

कॉलेजला जाताना अपहरण झाल्याची तक्रार


गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी तिचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी आले होते. त्यांनी आरोप केला की त्यांच्या मुलीचे 4 जणांनी अपहरण केले होते. कॉलेजला जात असताना त्यांच्या मुलीचा मार्ग अडवण्यात आला आणि तिला उचलून नेण्यात आले असे तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले होते. यानंतर तिने कशी-बशी त्या चौघांच्या तावडीतून सुटका केली असा दावा पालकांनी केला होता.

तरुणीने घटनास्थळाचा व्हिडिओ सापडल्यानंतर दिली कबुली


पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर संबंधित तरुणीला घटनास्थळी नेऊन तपास केला. यावेली नागपूर क्राइम ब्रांचची टीम सुद्धा उपस्थित होती. परंतु, घटनास्थळी नेल्यानंतर आणि त्या ठिकाणी नेण्यापूर्वी तरुणीने दिलेल्या जबाबांमध्ये कमालीचे अंतर दिसून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. बीए सेकंड इयरला शिकणारी ही तरुणी कॉलेजमधून निघाल्यानंतर नेमके काय घडले याची सुद्धा कॉलेजच्या सीसीटीव्हीत पाहणी करण्यात आली. त्यामध्येच तरुणीला 4 जण नव्हे, तर ती स्वतःच एका तरुणासोबत जाताना दिसून आली.

कुटुंबीय पोलिसांकडे जातील याची कल्पना केली नव्हती...


पोलिसांनी हेच पुरावे त्या विद्यार्थिनीला दाखवून पुन्हा चौकशी केली. तेव्हा तिने अपहरणाचे खोटे नाट्य रचल्याची कबुली दिली. कॉलेज संपताच आपण बॉयफ्रेंडसोबत वाकी येथे फिरायला गेलो होतो अशी कबुली तिने पोलिसांसमोर दिली. यानंतर तिच्या प्रियकराने तिला घरापर्यंत ड्रॉप केले. हे सुद्धा व्हिडिओमध्ये दिसून आले. आपल्या प्रियकरासोबत बाहेर गेल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यास ते रागावतील या भितीने संपूर्ण नाट्य रचले. स्वतः सुटून आल्यानंतर कुटुंबिय पोलिसांकडे जातील याची तिने कल्पनाच केली नव्हती. यानंतरच तिचे नाटक उघडे पडले. दरम्यान, पोलिसांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तसेच तरुणीला ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.