आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय तरुणीने विमानात लिहिले लव्ह लेटर, जगभर झाले व्हायरल, तब्बल 50 हजार शेअर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील रहिवासी 21 वर्षीय तरुणी एंड्रियाचे लव्ह लेटर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एंड्रियाने हे पत्र विमानात लिहिले होते, जे तब्बल 50 हजार वेळा शेअर करण्यात आले आहे. लोकांना या लव्ह स्टोरीची रायटर एंड्रियाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

 

रेडिटवर केले पोस्ट
एंड्रियाच्या सिकनेस बॅग (उलटीसाठी वापरले जाणारे) वर लिहिण्यात आलेले लव्ह लेटर विमानाच्या एका सफाई कर्मचाऱ्याला मिळाले होते. या महिलेने सांगितले की, मागच्या वर्षी मी जेव्हा एकदा विमानाची सफाई करत होते, तेव्हा मला सीटच्या मागच्या भागात पत्र आढळले. या महिला कर्मचाऱ्याने मग ते रेडिट वेबसाइटवर पोस्ट केले. 

 

एंड्रियाने लिहिले की, तिला आपल्या भावना प्रियकराला सांगायच्या आहेत. तिने लिहिले, "मी खूप बोर होत आहे. सध्या मी विमानात आहे आणि मियामीहून डिस्ट्रिक्ट कोलंबियाला जात आहे. मी 21 वर्षांची आहे.''

 

तिने लिहिले, "मी काल सकाळी 4 वाजता विमानाचे तिकीट काढले, कारण मी माझ्या बेस्ट फ्रेंडवर खूप प्रेम करते. तो बोस्टनहून न्यू ऑर्लियन्सला येत आहे. यादरम्यान तो डिस्ट्रिक्ट कोलंबियामध्ये थांबेल.''

 

एंड्रियाने लिहिले, "मी डिस्ट्रिक्ट कोलंबियामध्ये राहते आणि माझ्या मित्राची भेट घ्यायला आतुर आहे. माझे हे पाऊल जास्तच बोल्ड वाटू शकते. परंतु मी सेमेस्टर परीक्षेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, यामुळे पुढचे पाच महिने त्याला पाहता येणार नाही. त्याला भेटण्यासाठी माझ्याकडे एवढीच एक संधी आहे.''

 

एंड्रियाने लिहिले, ‘‘खरं म्हणजे मलाच कळत नाहीये की मी काय करत आहे, कुणाचीही परवा न करता मी त्याला भेटायला जात आहे. माझे वायफाय सुरू नाही, म्हणून खूप बोअर होत आहे. माझी मदत करा, मी जो वेडेपणा आज करतेय, तसाच काहीसा करा.’’

 

हे पत्र 50 हजार वेळा शेअर करण्यात आले आहे. लोकांनी यावर हजारो कॉमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, ‘‘मुलीने रोमँटिक गोष्टीही फनी अंदाजात लिहिल्या आहेत. देव करो, तिच्यासोबत सर्व चांगले होवो. आणखी एकाने लिहिले, ‘‘मग पुढे या मुलीसोबत काय घडले, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे?’’ 

 

बातम्या आणखी आहेत...