Home | Khabrein Jara Hat Ke | 21:29 hours long on Rosa Iceland, while New York 11:58 hours a day

जगात २१.२९ तासांचा दीर्घ रोजा आइसलँडवर, तर न्यूझीलंडमध्ये लहान ११.५८ तासांचा रोजा

इम्रान खान | Update - May 14, 2019, 11:20 AM IST

आइसलँडवर फक्त सहा तासांची रात्र, इफ्तार-सेहरीमध्ये फक्त चार तासांचा फरक

 • 21:29 hours long on Rosa Iceland, while New York 11:58 hours a day

  जयपूर - इस्लाम धर्मात सर्वात पवित्र महिना रमजान संयम बाळगून उपाशी राहण्याचा व खुदाची इबादत करण्याचा महिना असतो. या वेळी उन्हाळ्यात आल्याने दिवस मोठा असतो. त्यामुळे संयम आणि परीक्षेचा काळ अजून वाढला आहे. जगात विविध देशांत दिवस मावळण्याचा व सकाळ होण्याच्या दृष्टीने सेहरी व इफ्तारची वेळ पाहता या वेळी सर्वात मोठा रोजा २१ तास २९ मिनिटांचा आइसलँडवर आहे. येथे शेवटचा रमजान सकाळी २ वाजून ८ मिनिटे व इफ्तार रात्री ११ वाजून ३८ मिनिटांचा असेल. पहिल्या रमजानला सकाळी दोन वाजून ४४ मिनिटास सेहरी व रात्री १० वाजून ८ मिनिटाला इफ्तार झाला.

  आइसलँडमध्ये इतका मोठा रोजा का?

  आइसलँडमध्ये दिवसाऐवजी रात्र लहान असते. दिवस १८ तासांचा व रात्र ६ तासांची असते. रात्री दहा वाजता इफ्तारसोबत एक राेजा पूर्ण होतो, तर पुढील चार तासांनी दुसऱ्या रमजानची सेहरी सुरू होेते.

  या देशात १७ ते २० तासांचा रोजा
  असे अनेक देश आहेत, जेथे १५ ते २० तासांचा एक रोजा असतो. यात स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क, रशिया व नॉर्वेमध्ये १७ ते २० तासांचा एक रोजा असतो. याशिवाय सिंगापूर, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, जिनेव्हा, ऑस्ट्रेेलिया, चिली व ब्राझीलमध्ये फक्त ११ ते १४ तासांचा रमजान असतो.

  येथे सर्वात मोठे रोजे
  शहर सेहरी इफ्तार वेळ
  आइसलँड 2:44 वा 10:08 वा. 21 तास 29 मिनिटे
  नेदरलँड 3:07 वा. 9:45 वा. 18 तास 39 मि.
  नार्वे 3:52 वा 8:39 वा. 17 तास 47 मिनिटे
  डेन्मार्क 2:37 वा. 9:58 वा. 19 तास 21 मि.

  येथे सर्वात लहान रोजे
  शहर सेहरी इफ्तार वेळ
  न्यूझिलंड 5:53 वा. 5:13 वा. 11तास 20 मि.
  ऑस्ट्रेलिया 5:23 वा. 4:55 वा. 11 तास 30 मिनिटे
  सिंगापूर 5:41 वा. 7:10 वा. 13तास 20 मि.
  इंडाेनेशिया 4:42 वा. 5:45 वा. 13 तास 3 मिनिटे
  अर्जेंटिना 4:39 वा. 6:11 वा. 14तास 22 मि.

Trending