आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींच्या पहिल्या वर्षात संघ शाखांत 217 % वाढ; अाता वेग कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - २०१४ मध्ये नरेंद्र माेदी हे देशाचे पंतप्रधान हाेताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांत वेगाने वाढ झाली. त्यांच्या सत्ताकाळाच्या पहिल्या वर्षात शाखा २१७ % नी वाढल्या. २०१५ मध्ये देशभरात ६,३५० शाखांची वाढ झाली; परंतु हा वेग अाता कमी झाला अाहे. तसेच २०१७ मध्ये ही संख्या ६६४ हाेती, तर या वर्षी ती १,७३४ एवढी अाहे. त्यामुळे संघाने अाता अापली विश्वासार्हता वाढवण्यासाठी १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान दिल्लीच्या विज्ञान भवनात 'भविष्यातील भारत : संघाचा दृष्टिकाेन' या विषयावर तीनदिवसीय चर्चासत्र अायाेजित केले अाहे.

 

> ५,८०,४८२ लाेक अातापर्यंत झाले अाॅनलाइन सदस्य. संघाने जुलै २०१२ मध्ये संकेतस्थळ सुरू केले हाेते. त्या वेळी महिनाभरात हजार जण संघाशी जाेडले जात हाेते. अाता हे प्रमाण १० हजारांवर गेले अाहे. त्यात बहुतांश १८ ते ४० वर्षे वयाचे तरुण व्यावसायिक अाहेत.
> ४,०८२ शाखा घटल्या हाेत्या २०१० मध्ये. २००९ च्या अहवालानुसार संघाच्या शाखा ४३,९०५ हाेत्या. त्या २०१० मध्ये कमी हाेऊन ३९,८२३ राहिल्या हाेत्या.


चर्चेत राहिल्याने वाढतात सदस्य
८५० जण राेज अाॅनलाइन जाेडले जात हाेते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात जाण्याच्या वेळी. ही स्थिती ३-४ दिवस हाेती.
संघाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की, संघाबद्दल जेव्हा केव्हा नकारात्मक किंवा सकारात्मक चर्चा हाेते, त्या वेळी सदस्यांत अाणखी वाढ हाेते. या दाव्याची पुष्टी करताना संघाचे म्हणणे अाहे की, प्रणव मुखर्जी हे संघ मुख्यालयात येण्याच्या दाेन दिवस आधी व नंतर एक दिवस अाॅनलाइन सदस्यत्व घेण्याचा वेग अडीचपट वाढला हाेता.

 

पाठिंबा वाढवण्यासाठी असे झाले प्रयत्न
- समरसता अभियान : 'एक मंदिर-एक विहीर-एक स्मशानभूमी'चा नारा देऊन मागास वर्गाचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न.
- बुद्धिजीवींचा अाेळख वर्ग : १० हजार पत्रकारांसह ४० हजार व्यावसायिकांशी वर्षभरात संपर्क साधण्यात अाला. तसेच ७ राज्यांत पत्रकारांच्या ५४० बैठका व १,३०० हून अधिक पत्रकारांचा सन्मान.
- भाषा संमेलन : दिल्लीत संघाने अशा प्रकारचा नवा उपक्रम सुरू केला अाहे. त्यात वेगवेगळ्या राज्यांच्या लाेकांना एकत्र अाणून संघाशी जाेडण्याचा प्रयत्न केला जात अाहे.
- अार्थिक मदत वाढली : गेल्या चार वर्षांत गुुरुदक्षिणेचे प्रमाण वाढले असून, संघातर्फे अार्थिकदृष्ट्या सक्षम हाेण्याच्या दिशेने काम केले जात अाहे. पूर्वी हा उपक्रम नियमित राबवला जात नव्हता; परंतु माेदी सरकार येताच याबाबतच्या हालचाली वाढल्या.
- साेशल मीडिया : पूर्वी संघ यापासून अंतर राखत हाेता; परंतु अाता फेसबुक, टि्वटरची फेरपडताळणी करून यावर सातत्याने सक्रिय अाहे.
- अायटी मेळावे : शाखांमध्ये दर महिन्याला अायटी मेळावे हाेत अाहेत. विज्ञान भारतीच्या बॅनरखाली ४ सायन्स फेस्टिव्हल अायाेजित केले.
- सरकारच्या धाेरणांसाेबत : वाजपेयी सरकारच्या अनुभवांवरू धडा घेत माेदी सरकारमध्ये उत्कृष्ट समन्वय. थेट संघर्ष न करता सरकारच्या धाेरणांची माहिती नागरिकांना देण्याचे काम संघ करत अाहे. अॅट्राॅसिटी कायद्याबाबत जनतेतील वातावरण सुधारण्यासाठी मोहीम हाती घेतली.
- विविध क्षेत्रांत प्रभाव वाढवणे : चित्रपट, कला, नाट्य, संस्कृती, प्रकाशन अादी विविध क्षेत्रांत संघाने तटस्थ लाेकांना स्वत:चा मंच उपलब्ध करून सक्रिय करत अापले स्थान निर्माण केले.

 

बातम्या आणखी आहेत...