आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वे चक्रीवादळ, 16 जणांचा मृत्यू, 5 लाख बेघर, ताशी 195 किमी वेगाने धडकले 'फनफोन'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
वादळामुळे सर्वाधिक नुकसान पर्यटनासाठी प्रसिद्ध बोराके व कोरोन या हिमप्रदेशांचे झाले आहे. - Divya Marathi
वादळामुळे सर्वाधिक नुकसान पर्यटनासाठी प्रसिद्ध बोराके व कोरोन या हिमप्रदेशांचे झाले आहे.

मनिला : फिलिपाइन्समध्ये बुधवारी नाताळच्या दिवशी आलेल्या फनफोन वादळाने मोठी हानी झाली. ताशी सुमारे १९५ किमी वेगाने आलेल्या वादळाच्या तडाख्यात १६ जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ४० हजारांहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशातील मोठा भाग काळोखात आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. लोकांना उंच ठिकाणी असलेल्या शाळा तसेच सरकारी इमारतींमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या मते, मध्य फिलिपाइन्स व उत्तर मिंडानाआे क्षेत्रातील सुमारे ३८ गावांत २४०० हून जास्त लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.

आधीच दिला होता वादळाचा इशारा 

मध्य फिलिपाइन्समध्ये या आधी अनेकदा वादळे आली. त्यामुळे हवामान विभागाने यापूर्वी वादळाचा इशारा देण्यात आला होता. फनफोनला स्थानिक भाषेत उर्सुला असे म्हटले जाते. मंगळवारी हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

परंतु, बुधवारी नाताळच्या दिवशी हे वादळ धडकले आणि हाहाकार उडाला. वादळामुळे वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

परिणाम : १६००० अडकले, ५०० उड्डाणेे रद्द

फिलिपाइन्सच्या वेगवेगळ्या प्रांतातून एकूण सुमारे ४.८३ लाख लोक बेघर झाल्याचे वृत्त आहे. ५०० हून जास्त अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली. त्याशिवाय १६००० सागरी पर्यटक, तसेच १४०० रोलिंग कार्गो व ४१ फेऱ्याही रोखल्या आहेत. सर्वाधिक परिणाम बोराके विमानतळ व कोरोन सारख्या पर्यटन स्थळांवर दिसून आला. वादळ जास्त घातक होऊ शकते.

मोठे वादळ : ६ वर्षांपूर्वी ७३०० मृत्युमुखी

२०१३ मध्ये आलेल्य विनाशकारी हयाननंतरचे हे दुसरे सर्वात मोठे वादळ आहे. तेव्हा सुमारे ७ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात बेपत्ता लाेकही होते. फनफोनमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील एका मोठा भूभाग अंधारात आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी वाढले आहे. १६ हजारांहून जास्त लोकांना शाळा, जिम व सरकारी इमारतींमध्ये रात्र काढावी .

दरवर्षी २० हून जास्त चक्रीवादळे

आशियात कॅथॉलिक समुदायबहुल फिलिपाइन्स जगातील सर्वाधिक नैसर्गिक संकटग्रस्त देशांपैकी आहे. त्यामागे पॅॅसिफिक रिंग ऑफ फायर व पॅसिफिक टायफून बेल्टमध्ये वसलेला हा भूप्रदेश असल्याचे कारण आहे. पावसात वादळ आल्यानंतर भूस्खलन व पूर येणे सामान्य आहे. येथे दरवर्षी २० पेक्षा जास्त वादळे, तसेच चक्रीवादळे धडकतात.