आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#21YearsOfPardes: पहिल्याच फिल्ममधून हीट झाली होती ही अॅक्ट्रेस, नंतर मात्र लागली करिअरला उतरती कळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई: 08 ऑगस्ट 1997 रोजी प्रदर्शित झालेल्या 'परदेस' या चित्रपटाच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुभाष घई दिग्दर्शित 'परदेस'ने रात्रीतून एका अनोळखी चेह-याला स्टार बनवले. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. पहिल्याच सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसह काम करून लोकप्रियता मिळवली खरी पण या सिनेमाच्या यशाचा तिच्या करिअरला मात्र फारसा काही फायदा झाला नाही. आता तर तिच्या लूकमध्ये एवढा बदल झाला, की तिला ओळखणेही कठीण झाले.


खरे नाव ऋतू चौधरी... 
महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी असल्याचे फार क्वचित लोकांना ठाऊक असावं. महिमाच्या करिअरला 21 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांत महिमाच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले. फ्लॉप करिअर, लग्नापूर्वीची प्रेग्नेंसी, लिएंडर पेससोबतचे अफेअर, सुभाष घईंवर लावलेला कास्टिंग काऊचचा आरोप... असे एक ना अनेक वाद महिमाच्या आयुष्याशी निगडीत आहेत. जाणून घेऊयात, महिमाच्या आयुष्याविषयी...

 

सुभाष घईंनी दिले महिमा हे नाव... 
13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये महिमाचा जन्म झाला. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते. पण 'परदेस' सिनेमात सुभाष घईने तिला केवळ भूमिकाच दिली नाही, तर महिमा हे नवीन नावदेखील दिले. 'परदेस' सिनेमापूर्वी एका जाहिरातीत महिमा झळकली होती. या जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी तिला 'परदेस'मध्ये संधी दिली होती.

 

'दाग द फायर'च्या भूमिकेची झाली होती प्रशंसा... 
'परदेस' सिनेमानंतर 'दाग द फायर'मध्येसुध्दा महिमाने चांगला अभिनय केला होता. 'धडकन' सिनेमात महिमाने सेकंड लीड साकारली होती. 'दिल क्या करे' आणि 'लज्जा'सारखे काही आठवणीत ठेवण्यासारखे तिचे सिनेमे आहेत.

 

'गुमनाम'मध्ये काम करुन इंडस्ट्रीतून गायब झाली होती महिमा... 
महिमा चौधरीचा 2008 मध्ये आलेला 'गुमनाम- द मिस्ट्री' या सिनेमानंतर जणू महिमाने सिनेसृष्टीपासून सन्यांसच घेतला. तिचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले. 

 

सुभाष घई यांच्यावर लावला होता कास्टिंग काउचचा आरोप...
महिमा चौधरीने काही वर्षांपूर्वी अप्रत्यक्षरित्या सुभाष घई यांच्या कास्टिंग काउचचा आरोप लावला होता.

 

पुढे वाचा, लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती महिमा... लिएंडर पेससोबत होते अफेअर.. यासह महिमाविषयी आणखी बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...