आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणात बुधवार + एकादशीचा शुभ योग, दुर्भाग्यापासून मुक्तीसाठी करा हे 3 काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचांगानुसार बुधवार, 22 ऑगस्टला श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. श्रावणात महादेवाची, बुधवारी श्रीगणेशाची आणि एकादशीला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. यामुळे 22 ऑगस्टला या तिन्ही देवतांची पूजा करण्याचा शुभ योग जुळून 
आला आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने पती-पत्नीला अपत्य सुख प्राप्त होऊ शकते. घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, एकादशीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात....


# एकादशीला पती-पत्नीने अशी करावी पूजा 
श्रावण शुक्ल एकादशीला सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून भगवान विष्णुसमोर बसून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. हा संकल्प पती-पत्नीने घ्यावा. या दिवशी अन्न ग्रहण करू नये. फलाहार घ्यावा, दूध पिऊ शकता. संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. पूजेमध्ये पिवळे फळ, पिवळे वस्त्र आणि मिठाई असावी. खीर नैवेद्य दाखवावी. श्रीविष्णू तसेच देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. पूजा झाल्यानंतर ब्राह्मणांना दान-दक्षिणा द्यावी.


# 11 कुमारिकांना जेवू घालावे...
वैवाहिक जीवनात अशांती किंवा अपत्य वारंवार आजारी पडत असल्यास पुत्रदा एकादशीचे व्रत करावे. यासोबतच घरी 11 कुमारिकांना आंमत्रित करून जेवू घालावे. आपल्या सामर्थ्यानुसार वस्त्र भेद द्यावेत. एखादे गिफ़्टही द्यावे.


# माहादेव आणि श्रीगणेशाची पूजा 
उत्तम करिअरसाठी या एकादशीला भगवान विष्णू तसेच शिव परिवाराचीही पूजा करावी. भगवान विष्णूंच्या मंदिरात तुपाचे दान करावे आणि शिव मंदिरात मिठाई दान करावी. यासोबतच महादेवाला अभिषेक करावा. विष्णू आणि शिव पूजेपूर्वी श्रीगणेशाची पूजा अवश्य करावी.

बातम्या आणखी आहेत...