आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोले - हरिश्चंद्रगडावर रविवारी ट्रेकिंगसाठी गेलेल्या व वाट चुकल्याने डाेंगरदऱ्यात अडकलेल्या कल्याण येथील २२ गिर्यारोहकांची सोमवारी सुखरूप सुटका करण्यात आली.
कल्याण येथील डॉ. हितेश अडवाणी हे काही गिर्याराेहकांसाेबत रविवारी हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आले होते. रात्री अंधारात दिसत नसल्याने त्यांच्या टीममधील २२ जण वाट चुकून अर्ध्यावरच अडकून पडले होते. ट्रेकर्समध्ये पाच महिलांचाही समावेश होता.
या टीममधील काही जणांनी रॅपलिंग करत हरिश्चंद्रगडाच्या सुमारे १८०० फूट खोल दरीतून उतरण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या सोबत असलेले अन्य सहकारी नाइट ट्रेक करून रॅपलिंग करणाऱ्यांना भेटणार होते. मात्र, रॅपलिंगसाठी किती वेळ लागणार, याचा अंदाज चुकला अाणि हे २२ जण अडकून पडले. त्यांचे सुमारे १००० फूट रॅपलिंग झाले. ८०० फूट अंतर शिल्लक होते.
ठाणे, नगर जिल्हा प्रशासनाने सुटकेसाठी स्थानिक रहिवासी व एनडीआरएफच्या तुकडीला पाठवले होते. मात्र, अवघड वाट, अंधारामुळे मदतकार्य थांबवायचा निर्णय झाला. ट्रेकर्सना रात्र कोकणकड्यावरच काढावी लागली. दरम्यान, डॉ. अडवाणी यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला मदतीसाठी फोन केला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तत्काळ एनडीआरएफच्या पथकाला पाठवले. या बचाव पथकात लाेणावळा, कल्याण, खाेपाेली व नाशिकच्या पथकांचा समावेश हाेता.
तज्ज्ञ मंडळींचा अभाव
मदतकार्य करणाऱ्या ट्रेकर्सच्या टीमचे समन्वयक राहुल मेश्राम म्हणाले की, या ग्रुपमध्ये पुरेशी तज्ज्ञ मंडळी नव्हती. त्यामुळे ते अडकले. सुमारे २४ तासानंतर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्वांची सुखरूप सुटका करण्यात अाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.