आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारावर मात करण्यासाठी आज रस्त्यावर उतरणार रातरागिणी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : दिव्य मराठीच्या 'मौन सोडू, चला बाेलू' या अभियानाच्या पुढील टप्प्यातील रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजता रातरागिणींची मशाल रॅली निघत आहे. या नाइट वॉकमध्ये बीडमधील हजारो युवती, महिला सहभागी होऊन अंधाराला वाकुल्या दाखवत आम्ही तुला आता घाबरत नाहीत हा संदेश देत प्रकाशाकडे वाटचाल करणार आहेत.

सारडा कॅपिटलजवळील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून रविवारी (दि. २२) रात्री ९ वाजता रातरागिणींच्या मशाल रॅलीस (नाइट वॉक) सुरुवात होणार आहे. सुरुवातीला गीत सादर होणार असून त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी पोलिस अधीक्षक हर्ष पोदार उपस्थित राहणार आहेत. यानंतर विविध क्षेत्रात रात्री काम करणाऱ्या प्रातिनिधीक सहा महिलांच्या हस्ते मशाल पेटवून उद्घाटन होणार आहे.

मामा चौकातून सुरू होणार 'रातरागिणीं'चा जल्लोष

जालना : प्रत्येकाला घरातील प्रियंका असो अथवा निर्भया या प्रिय असतात. त्या सुरक्षित वातावरणात आणि निर्भयपणे शहरात वावराव्यात, अशा वातावरणाची निर्मिती होणे ही सध्याची गरज आहे. त्यासाठी 'दैनिक दिव्य मराठी'च्या वतीने 'मौन सोडू,चला बोलू' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी वर्षातील सर्वात माेठी रात्री म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या २२ डिसेंबरच्या रात्री 'अंधारावर चालून जाणार रातरागिणी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात मामा चौक येथून 'नाइट वॉक'चे आयेाजन करण्यात आले आहे. आज रविवारी रात्री ९ वाजता मामा चौक येथून याचा प्रारंभ होणार आहे.

या वाॅकला सर्वच क्षेत्रातील महिला माेठ्या संख्येने सहभागी हाेणार असून महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे. 'दिव्य मराठी'च्या 'माैन साेडू चला बाेलू' या अभियानांतर्गत रविवारी (२२ डिसेंबर) जालना शहरातील मामा चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत रातरागिणींचा नाइट वाॅक होणार अाहे. नाइट वाॅकमध्ये शहरातील सर्वच महिला संघटना, तरुणी, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी हाेत अाहेत. अंधाराची भीती घालवण्यासाेबत सबलीकरणाचा उत्सव जल्लाेषात साजरा करत हजाराे रातरागिणी अंधारावर चालून जाणार अाहेत. दरराेज अंधाराशी सामना करत वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून या वाॅकला सुरुवात हाेणार अाहे. उपक्रमात जल्लाेष भरण्यासाठी विविध कार्यक्रम होतील. रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी हजारो महिला एकवटतील. नाइट वाॅकमध्ये शहरातील सर्वच महिला संघटना, तरुणी, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी हाेत असून, अंधाराची भीती घालवण्यासाेबत सबलीकरणाचा उत्सव जल्लाेषात साजरा करत हजाराे रातरागिणी अंधारावर चालून जाणार अाहेत.
 

बातम्या आणखी आहेत...