आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर; देशात एकूण ६ लाख घरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्र शासनाकडून पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत शहरी गरिबांसाठी देशात ६ लाख २६ हजार ४८८ घरे मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी महाराष्ट्रासाठी २२ हजार २६५ घरे अाहेत. केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. 


महाराष्ट्रातील एकूण ४७ प्रकल्पांसाठी ही घरे मंजूर झाली असून त्यासाठी एकूण ७०९.९ कोटी खर्च येणार आहे, पैकी केंद्राकडून ३२८.९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील भागीदारी तत्त्वानुसार (एएचपी) करण्यात येणाऱ्या बांधकामांच्या २७ प्रकल्पांसाठी एकूण १८ हजार ३०० घरे मंजूर झाली असून याकरिता ५०४.८ कोटी खर्च येणार आहे. यापैकी २७४.५ कोटीचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. 


लाभार्थींकडून वैयक्तिकरीत्या करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या (बीएलसी) १७ प्रकल्पांसाठी एकूण २ हजार ९४६ घरे मंजूर झाली असून याकरिता १६९.२ कोटी खर्च येणार आहे. यापैकी ४४.२ कोटींचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. तसेच, झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत (आयएसएसआर) राज्यातील ३ प्रकल्पांसाठी एकूण १ हजार १९ घरे मंजूर झाली अाहेत. याकरिता ३५.९ कोटी खर्च येणार आहे, पैकी १०.२ कोटींचा निधी केंद्राकडून मंजूर झाला आहे. 


राज्याला आतापर्यंत ६ लाख १२ हजार घरे मंजूर 
पंतप्रधान आवास योजना (शहरी)अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राला २७३ प्रकल्पांसाठी ६ लाख १२ हजार घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत. गुुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा, त्रिपुरा, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या ११ राज्यांसाठी ६ लाख २६ हजार ४८८ घरे मंजूर करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...