आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदीवर मिळेल 22 हजारांची सूट, त्यासोबतच या ऑफर्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वाढते प्रदुषण कमी करण्याच्या दिशेने दिल्ली सरकारने सकारात्मक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी एक धोरण तयार करून या  पॉलिसीचा ड्राफ्ट तयार केला आहे. या अंतर्गत 2023 पासून रजिस्टर्ड होणाऱ्या नवीन गाड्यांमध्ये 25 टक्के वाहने हे ईलेक्ट्रीकल असतील.
 

दर 3 km वर चार्जिंग स्टेशन

दर 3 km वर चार्जिंग स्टेशन असतील तर प्रायव्हेट चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी सबसिडी दिली जाईल. त्यासोबतच दिल्लीत 50 टक्के ई-बसेस चालवण्याचे टार्गेट दिल्ली सकरारने ठेवले आहे.

 

टू व्हीलर्सवर 22 हजारापर्यंतची सूट

या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदीवर 22 हजार रूपयापर्यंतची सब्सिडी दिली जणार आहे. या वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा कमी किंवा त्यांच्या इतकीच असेल. त्याव्यतिरीक्त, बीएस-2 आणि बीएस-3 टू-व्हीलरला स्क्रॅप करणाऱ्यांना 15,000 रूपये इन्सेंटिवही दिली जाईल. राजधानीत ई-टू व्हीलर टॅक्सीपण चालवली जाईल.

 

पुढे वाचा: रोड टॅक्स आणि पार्किंग असेल फ्री

 

 

 

बातम्या आणखी आहेत...