Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | 23 dead in accident during the time of 12 am to 3 am

रात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान अपघातांत २३ जणांचा मृत्यू

प्रितिनिधी | Update - Dec 08, 2018, 08:57 AM IST

बेफाम अन‌् बेशिस्त शहरात वर्षभरामध्ये ५२९ अपघातांत १८४ ठार

 • 23 dead in accident during the time of 12 am to 3 am

  नाशिक- शहरातील बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम सुरू असतानाच रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर बेफाम वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. विशेषत:, रात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत झालेल्या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला. वर्षभरात शहरामध्ये ५२९ अपघातात १८४ नागरिकांनी प्राण गमावले, तर २६८ चालक कायमचे जायबंदी झाले.


  शहरातील रस्त्यावरील वाहतूक आणि त्यातील असुरक्षितता हा मुद्दा पुन्हा एकदा वाढत्या अपघातांच्या आकडेवारीतून अधोरेखित झाला आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवणे, बेपर्वाईने वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षेचा विचार न करणे अशा विविध वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतुकीतून निदर्शनास येत आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असले तरी वाहनचालकांमध्येच अद्याप वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत गांभीर्य नसल्याचे वाढत्या अपघातांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.


  अतिवेग, धोकादायक ओव्हरटेक, लेन कटिंग, मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे, अधिक वजन वाहून नेणे, गाडी चालवण्याचे प्रशिक्षण न घेणे, अतिताण-थकवा असताना वाहन चालवणे, कुठेही वाहन उभे करणे, हेल्मेट-सीटबेल्टचा वापर न करणे.
  अपघात टाळण्यासाठी या नियमांचे पालन आवश्यक
  लेन शिस्त, वेगमर्यादा, सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर, वाहन चालवताना सतर्कता, रात्रीच्या वेळी पुढील-मागील दिवे सुरू आहेत का नाही याची खात्री, वाहतूक नियमांचे पालन, मद्यपान टाळा, धोकादायक ओव्हरटेक टाळा, वाहनाचे योग्य ठिकाणी पार्किंग, डाव्या बाजूने ओव्हरटेक टाळा, गरज असल्यासच ओव्हरटेक, अन्य वाहनांपासून सुरक्षित अंतर, गाडीची माहिती नसल्यास चालवणे टाळा, मोबाइलवर बोलणे टाळा.
  नियमांचे पालन हीच सुरक्षितता
  वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे हीच खरी सुरक्षितता आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे चालकांचे कर्तव्य आहे. - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

Trending