आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 23 time Grandslam Champion Serena Will Change Her Strategy!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२३ वेळेची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना बदलणार आपले डावपेच!

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकन टेनिसपटू सेरेना विलियम्स गेल्या तीन वर्षांपासून एकही ग्रँडस्लॅम जिंकू शकली नाही. २०१७ मध्ये आई झाल्यानंतर ती चार महत्त्वाच्या स्पर्धेत फायनलमध्ये पराभूत झाली. २३ ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाला गेल्या १० वर्षांपासून प्रदर्शन देत असलेल्या पॅट्रिक माऊरातोग्लोने म्हटले की, आम्हाला रणनीती बदलावी लागेल आणि वास्तविकतेला स्वीकारावे लागेल. पॅट्रिकच्या मार्गदर्शनात सेरेनाने १० ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. त्यांनी म्हटले की, आपली रणनीती कामी येत नाही, हे स्वीकारवे लागेल. आता आपल्याला वेगळी योजना व लक्ष्य ठेवावे लागेल.

३८ वर्षीय सेरेनाने जानेवारीत ऑकलंड क्लासिक स्पर्धा जिंकली हाेती. हा तिचा तीन वर्षांतील पहिला किताब ठरला. प्रशिक्षकाने म्हटले, खेळाडू अद्यापही खेळाच्या बाबतीत सकारात्मक आहे. त्यामुळे आज देखील कोर्टवर आहे. नाही तर ती खेळातून केव्हाच बाहेर झाली असती. ती पुनरागमन करेल अशी मला देखील आशा आहे.