आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुशाच्या ढिगाऱ्यात मिळाला तरूणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह, वडील आणि भाऊ म्हणाले- तिच्या वागण्यामुळए त्रस्त झालो होतोत म्हणून घेतला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शामली(उत्तर प्रदेश)- शामलीच्या थानाभवन क्षेत्रातील गावात ऑनर किलींगचे प्रकरण समोर आले आहे. वडिलांनीच मुलासोबत मिळून मुलीचा खून केला आणि मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना तपास लावून दोन दिवसांतच आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतले.


भुशाच्या ढिगाऱ्यात जळत होता मृतदेह
- सोंहजनी उमरपूरमध्ये 23 मार्चला गावातील आस मोहम्मदच्या शेतातील भुशाच्या ढिगाऱ्यात तरूणीचा जळालेला मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी तक्रार दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
- पोलिस तपासात मुलीची ओळख मुसरत शमशेर अली (23) अशी झाली. पोलिसांनी चौकशी केली असता, बाप-लेक अनेकवेळा पोलिसांना चकवा देत होते, पण नंतर कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.


असा केला खून
- आरोपींनी सांगितले की, 22 मार्चला मध्यरात्री 3 वाजता मुसरतला एका शेतात घेऊन गेले. पहिले लाठी मारून डोक्याचे हाड मोडले आणि नंतर गळा दाबला. शेवटी जीव गेल्यावर त्यांनी भुशात तिला जाळले.
- आरोपी बापाने सांगितले की, त्याच्या मुलीची लक्षणे ठीक नव्हती, ती फोनवर अनेक मुलांशी बोलत होती, आणि यामुळेच तिचे लग्नदेखील होत नव्हते. त्यांनी तिला अनेकवेळा समजुन सांगण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील ती ऐकत नव्हती.  
- मुलीच्या अशा वागण्याने परिसरातील लोगही ताणे मारत होते, यामुळेच मुलगा इजराइलसोबत मिळून 1 महिन्यापूर्वी मुलीला मारण्याचा प्लॅन केला. 
 

बातम्या आणखी आहेत...