आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्ह्या बाळाच्या शरीरात अडकलाय 23 वर्षांचा माणूस! लोक म्हणतात ईश्वराचा अवतार, हे आहे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - पंजाबच्या हिसार जिल्ह्यातील एका गावात राहणारा मनप्रीत सिंह तान्हे बाळ दिसत असला तरीही त्याचे वय 23 वर्षे आहे. 1995 मध्ये हिसार येथे त्याचा जन्म झाला. वर्षभर सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु, मनप्रीतचे वय जसे-जसे वाढत गेले तेव्हा आपल्या मुलाच्या शरीराची वाढच होत नाही असे कुटुंबियांच्या लक्षात आले. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने त्याला एक दुर्मिळ आजार झाला असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, लोकांनी त्याला ईश्वराचा अवतार समजून त्याची पूजाच सुरू केली. 


आजार जाणून घेण्यासाठीही येईल 5 लाखांचा खर्च
> मनप्रीतला या अवस्थेत चालता देखील येत नाही. त्याला हाताने खाता येत नसल्याने अजुनही कुटुंबियांवर विसंबून राहावे लागते. कुठेही जाण्यासाठी त्याचे मामा-मामींना सोबत घेऊन जावे लागते. स्थानिक डॉक्टरांनी त्याचे असे हाल हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने झाले असा दावा केला. परंतु, संशोधकांनी याचे वेगळेच कारण दिले आहे.
> मनप्रीतला लॅरोन सिन्ड्रोम झाला असावा असे संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु, त्याला खरोखर हा आजार झालाय का याचा तपास करणे आवश्यक आहे. या रोगावर उपचार तर सोडाच, फक्त त्याची खात्री करून घेण्यासाठीच 5 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तेवढा पैसा कुटुंबियांकडे नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तो लहान मुलाच्या शरीरात कैद झाला आहे. 
> या रोगात एखाद्या बाळाच्या शरीरात Insulin-like Growth Factor 1, (IGF-1) ची पसरतात. त्यामुळे शरीरातील स्नायूंची वाढ होत नाही. या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण एक्वाडोरच्या लोजा प्रांतात आहेत. मनप्रीतला एक बहिण आहे. ती नुकतीच 17 वर्षांची झाली. तर भाऊ सुद्धा व्यवस्थित वाढला आहे. मनप्रीत सध्या आपल्या मामाच्या घरी राहतो. तेच त्याची काळजी घेतात. 

बातम्या आणखी आहेत...