आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजाची 230 रोपटी नष्ट; 750 किलाे अाेला गांजा केला हस्तगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे -  पाेलिसांनी हेंद्रूण येथे चक्क गांजाची शेती उद‌्ध्वस्त केली. यात शेतात लावलेली गांजाची २३० मोठी रोपटी नष्ट केली. पोलिस व इतरांपासून हा प्रकार लपून राहावा यासाठी गांजाच्या झाडांभोवती कापूस व तूर या पिकांची लागवड करण्यात अाली हाेती. या कारवाईत रोपट्यांसह तब्बल ७६६ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे सहा लाख रुपये एवढी अाहे. तर संशयित प्रकाश नवसारेविरुद्ध मोहाडी पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हेंद्रूण येथील प्रकाश जगन नवसारे (वय ५८) यांच्याजवळ विक्रीसाठी गांजा आहे, अशी माहिती मोहाडी पाेलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नवसारे याच्या घरी जाऊन कारवाई केली. त्या वेळी नवसारे यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत मुळासह उपटलेल्या गांजाच्या रोपट्यांचा ढीग अाढळला. याबाबत विचारणा केल्यावर नवसारे यांनी प्रारंभी उलटसुलट उत्तरे दिली. त्यानंतर गावशिवारात टेकडीजवळील आपल्या शेताकडे नेले. या ठिकाणी सर्वत्र कपाशी लावण्यात आली होती. त्याच्यापुढे तूर तर सर्वात मधोमध गांजाची राेपे लावण्यात आली होती.

 

पोलिसांनी गांजाची ही रोपटी मुळासह उपटून जप्त केली. काल सोमवारी रात्री नऊ वाजेपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. या प्रकरणी प्रकाश नवसारे याला अटक करण्यात आली आहे. शिवाय त्याच्या विरोधात मोहाडी पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त गांजाची किंमत सुमारे सहा लाख १२ हजार ८०० रुपये एवढी आहे. मोहाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी अभिषेक पाटील, पीएसआय स्वप्निल राजपूत, दिनेश मोरे या अधिकाऱ्यांसह राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राम्हणे, माळी, गणेश भामरे, अजय दाभाडे, महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


रात्री आठ वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत उपटली रोपटी 
समन्स बजावताना मिळाली टीप... 
मोहाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडे समन्स, वॉरंट बजावण्याचे काम दिले आहे. दोन कर्मचारी सोमवारी याच कामामुळे हेंद्रूण गावात गेले होते. त्या वेळी प्रकाश नवसारेबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. दोघा पोलिसांनी माहितीची पडताळणी करून लागलीच अधिकारी अभिषेक पाटील यांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच पोलिस पथक नवसारे यांच्या घरापर्यंत व नंतर शेतात पोहाेचले. 


मोठ्या रॅकेटवर 'प्रकाश' खरेदीदाराचा पोलिस घेताहेत शोध... 
हेंद्रूण शिवारातील दुर्गम भागात असलेल्या शेतात हा गांजा लावण्यात आला होता. त्याची विक्री करायची वेळ आल्यामुळे नवसारे यांनी तो घरी आणला होता. त्यामुळे पाेलिस नवसारे यांच्याकडे चौकशी करत आहे. गांजाचा खरेदीदार कोण? याच्या उत्तरासोबत पोलिस इतर संशयितांनाही ताब्यात घेऊ शकतात. तसे संकेत पोलिसांनी दिले आहेत. 


गांजाची झाडे उपटून बॅगेमध्ये भरताना मोहाडी पोलिस ठाण्याचे अिधकारी व कर्मचारी. कपाशीच्या शेतात ही झाडे लावण्यात आली होती. रात्री ही कारवाई करण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...