Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | 24 year complete to Nomination of Marathwada University

नामांतराचे आम्ही लढवय्ये; आज नामांतर होऊन २४ वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने नामांतराने आंबेडकरी चळवळीतील लढवय्यांना काय दिले, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच...

दिव्य मराठी | Update - Jan 14, 2019, 09:40 AM IST

तत्कालीन शरद पवारांच्या सरकारने १४ जानेवारी १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात नामविस्ताराची घोषणा केली होती.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  औरंगाबाद- सतत १७ वर्षे नामांतर संगर सुरू होता. शेवटी दलित पँथरचा नांदेड जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे या तरुणाने नामांतर होत नाही म्हणून भरचौकात स्वतःच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले आणि तत्कालीन शरद पवारांचे सरकार हादरले. शेवटी सरकारला १४ जानेवारी १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात नामविस्ताराची घोषणा करावी लागली. आज नामांतर होऊन २४ वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने नामांतराने आंबेडकरी चळवळीतील लढवय्यांना काय दिले, त्यांनी नेमके काय केले, कशामुळे हे यश मिळाले या प्रश्नांची उत्तरे त्या लढवय्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न 'दिव्य मराठी’ने केला.

  पुढील स्लाइड्सवर वाचा- लढवय्यांविषयी...

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  आठवलेंनी दिली होती राजीनाम्याची धमकी- बाबूराव कदम,  कार्याध्यक्ष रिपाइं
  > आमचे नेते रामदास आठवले  समाजकल्याण राज्यमंत्री होते. त्यांनीही मंत्रिमंडळात नामविस्ताराचा प्रश्न सातत्याने रेटून धरला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची धमकीही दिली होती.  

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  पँथरने दिलेल्या एकतेच्या बळाचे यश- प्रकाश निकाळजे,   माजी उपमहापौर
  > दलित पँथर या सामाजिक संघटनेने आम्हाला एकतेचे बळ आणि सामाजिक भान दिले होते. आमचे नेते गंगाधर गाडे निर्भीड असल्यानेे सरकारही नमले  आणि आमचा, समतेचा विजय झाला.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  ते खया अर्थाने मंतरलेले दिवस- रतनकुमार पंडागळे,  माजी सभापती  

  > ते खऱ्या अर्थाने मंतरलेले दिवस  होते. बघता-बघता संघर्षाची १७ वर्षे कशी निघूल गेली ते कळलेसुद्धा नाही. दावे कोणीही करोत, पण तमाम जनतेचा नामविस्तारात खारीचा का होईना वाटा आहे.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  या लढ्याने दिले समाजभान, धाडस- दौलत खरात,  नेते रिपाइं 
  > नामांतर लढ्याने आम्हाला समाजभान दिले. कधी आपला आर्थिक लाभ हाेईल ही भावना कधी मनाला शिवली नाही. कारण हाती घेतलेले कार्य हे कोणाचे नसून आमच्या बापाच्या नावासाठीचे होते. 

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  नामांतराचे श्रेय घेण्यातच धन्यता- रमेशभाई खंडागळे ज्येष्ठ विचारवंत
  > केवळ श्रेय घेण्यात धन्यता मानणे चुकीचे आहे. ज्यांनी नामांतरासाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या मुलांनी तरी या विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहे काय ? आता समाजाची तळमळ असणारा नेता मिळेल का हो, असे म्हणायची वेळ आली आहे.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  कार्यकर्ते नि:स्वार्थी होते म्हणून- मिलिंद शेळके,  उपाध्यक्ष, रिपाइं 
  > नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची फौज मराठवाडा आणि विदर्भात तयार झाली होती. कोणाला नोकरी नव्हती, कोणाचा व्यवसाय नव्हता. आर्थिक परिस्थितीही सर्वांचीच नाजूक होती. पण ध्येय एकच होते. स्वार्थ मनाला शिवला नाही म्हणून नामविस्तार होऊ शकला.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  आमच्यासमोर अपुरे पडायचे पोलिसांचे बळ- दिनकर ओंकार  नेते, भीमशक्ती  
  > अंतुले मुख्यमंत्री असताना गंगाधर गाडे, शेगावकरांच्या नेतृत्वात ५० हजार भीमसैनिकांचा मोर्चा निघाला होता. तो पाहून अंतुलेही चकित झाले होते. त्या काळात आमच्या अनेक आंदोलनांना सामोरे जाताना पोलिसांचे बळ कमी पडायचे.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  लाँग मार्चने देशाचे नव्हे जगाचे लक्ष वेधले- अॅड.जे.के. नारायणे, पीरिप
  > प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च काढला आणि राज्यात, देशातच नव्हे तर जगभरात या प्रश्नाला आणखीच महत्त्व आले. नामांतराचा प्रश्न आणखी तीव्र झाला. कवाडेंच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची संधी मिळाली, हे महत्वाचे.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  ती तर आमच्या अस्मितेची लढाई होती- श्रावण गायकवाड, नेते रिपाइं 
  > बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. समाजाचे दु:ख वेशीवर टांगले. अशा महापुरुषाच्या नावासाठी आम्ही काहीच मागेपुढे पाहिले नाही. ती लढाई आमच्या अस्मितेची झाली होती. त्यासाठी म्हणून आम्ही १७ वर्षे संघर्ष तेवत ठेवला. 

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  लढ्याने उंचावली आमची प्रतिमा- राहीबाई जावळे,  आंबेडकरी अनुयायी  
  > तुरुंगवास भोगला, पण मागे हटले नाही. बाबासाहेबांचे महान कार्य डोळ्यासमोर ठेवून लढले. काही मिळेल अशी अपेक्षा मुळीच केली नाही. या लढ्यातून विद्यापीठाला नाव मिळाले आणि माझ्रासारख्या सामान्य महिलेची प्रतिमा समाजात उंचावली. 

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  शहीद कुटुंबीयांचे पुनर्वसन नाही- मधुकरराव भोळे, भूमिपुत्र संघटना
  > सांघिक लढ्यातील ताकद नामविस्तारामुळे जगाच्या लक्षात आली. मात्र, या लढ्यातील शहिदांपैकी अनेकांच्या कुटुंबांची परिस्थिती आजही हलाखीची आहे. त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी  सांघिक प्रयत्न झाला नाही. 

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  खारीचा वाटा उचलला त्याचे मोठे समाधान-  मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष, रिपाइं
  > त्या काळात मोर्चासाठी औरंगाबाद शहरात येणाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, जागोजागी पोस्टर्स लावणे यात मी होतो. पोलिसांच्या लाठ्या-काठ्याही खाल्ल्या. त्या लढ्यात खारीचा का होईना वाटा उचलला याचे समाधान आहे.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र- सुरेश शिनगारे,  संत कबीरनगर 
  > भीम के नाम पर खून बहता है तो बहने दो असे म्हणत नामांतर लढ्यात उतरलो. जमेल तसा संघर्ष केला. पण सरकारच्या समोर भीक न मागता अगदी स्वाभिमानाने लढाई लढलो आणि यशस्वीही झालो. स्वाभिमानानेच जगले पाहिजे हा मंत्र साऱ्यांना मिळाला. 

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  २४ वर्षांत विद्यापीठाची गुणवत्ता वाढली नाही- कृष्णा बनकर, आंबेडकर फोर्स
  > नामांतर लढ्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. या कामासाठी सरकारकडून अपेक्षा नव्हतीच. पण समाजातील सधन लोकांनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  संघर्षाची देणगी समाजासाठी वापरावी-अर्जुन मोकळे,  हर्षनगर 
  > शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे डाॅ. बाबासाहेब आम्हाला सांगून गेले. आम्ही शिकलो, संघटित न होताच संघर्ष करत आहाेत. हा प्रकार म्हणजे बाबासाहेबांच्या विचारापासून दूर जाणारा आहे. आता संघर्षाची देणगी समाज हितासाठी वापरली पाहिजे.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  आर्थिक प्रश्नावर लढा उभारणे गरजेचे- अशोक जाधव,  क्रांतीनगर
  >  नामांतर लढ्यानंतर आमच्यात एकत्रितपणा राहिला नाही. काही घटनांच्या वेळी स्थानिक नेते एकत्र येतात, पण वरिष्ठांना एकत्र येण्याची राजकीय अॅलर्जी आहे. नामांतरासारखा लढा आता आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर लढण्याची गरज आहे.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  अशोक चव्हाणांचा ताफा थांबला होता- जालिंदर शेंडगे   उपाध्यक्ष, भाजप
  > आम्ही शहीद गौतम वाघमारेंच्या घरी जाण्यासाठी निघालो. तेव्हा समोर तत्कालीन मंत्री अशोक चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा होता. गंगाधर गाडेंच्या नेतृत्वात आम्ही इतके आक्रमक होतो की ते पाहून चव्हाण यांचा ताफा जागीच थांबला होता.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  बाबांचं नावच आमचं भूषण- गौतम लांडगे, माजी नगरसेवक
  > नामांतरासारखा लढा जगाच्या पाठीवर लढला जाणार नाही. या लढ्याने चळवळीला शहाणपण दिले, नवी दिशा दिली. संघर्षाची भावना दिली. आमचे अख्खे कुटुंब नामांतर लढ्यात होते. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळाले ही आमच्यासाठी भूषणावह गोष्ट आहे.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  १७ वर्षे नामकरण नाही- - सिद्धांत गाडे,  पीरबाजार  
  > माझे वडील नामांतराचे खरे शिल्पकार आहेत...त्यांच्याएवढा लढा अन्य कोणत्याच नेत्याने दिलेला नाही. जोपर्यंत नामांतर होणार नाही, तोवर माझ्या मुलाचेही नाव ठेवणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली होती. यापेक्षा आणखी काय हवे?

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  भीमगीतांमधून प्रबोधनही केले- मुकुंद सोनवणे,
  > एका खेड्यातून आलेल्या माझ्यासारख्या तरुणाची ओळख राज्यात झाली हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे, असे मी मानतो. अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरा जात मी संघर्षासह भीमगीतांतून लढा लढलो याचा मला अभिमान वाटतो.

   

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  माझ्या वडिलांनी निळा झेंडा पडू दिला नाही- प्रशांत शेगावकर, क्रांतीनगर 
  > माझे वडील प्रीतमकुमार शेगावकर यांच्या नेतृत्वाखाली नामांतराची चळवळ मोठ्या नेटाने लढली गेली. त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवासही भोगला, पण बाबासाहेबांच्या नावासाठी हाती घेतलेला निळा झेंडा कधी खाली पडू दिला नाही.

   

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  तरुणांना सक्षम करा- प्रकाश  गायकवाड, क्रांतीनगर
  > डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आमचा जीव की आत्मा आहे. त्यांच्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. पण यापुढे  वेगळी लढाई लढावी लागणार आहे.  नोकऱ्या, राजकारणातही तरुणांची आर्थिक बाजू मजबूत कशी होईल, यासाठी लढे उभारण्याची गरज आहे.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  डोक्याला कफनच बांधले होते-बंंडू कांबळे  कामगार नेते
  > नामांतरासाठीच्या प्रत्येक मोर्चात सहभागी होणे आणि पोलिसांचा मार खाणे  हा १७ वर्षे माझ्या आयुष्याचा भाग होता. कारण तो दलित पँथरचा आमच्यावरील संस्कारच होता. डोक्याला कफन बांधूनच माझ्यासारखे हजारो तरुण लढ्यात उतरले होते.

 • 24 year complete to Nomination of Marathwada University

  बाबासाहेबांचे नावच आमची श्रीमंती- मनोज वाहूळ, मुरलीधरनगर 
  > १९७२ मध्ये दोन वेळच्या अन्नाचीही सोय नव्हती. तरीही माझी आई दगडाबाईने नामांतराच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. नामांतरामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो नसलो तरी बाबासाहेबांचे नावच आमची श्रीमंती आहे.

   

Trending