आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्सने 24 वर्षांपूर्वीच केली होती फेक न्यूज आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसची भविष्यवाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंग्टन - सध्या सोशल मीडियावर बातम्यांचा महापूर वाहताना दिसत आहे. पण त्यातील अनेक बातम्या खोट्या असतात. तर दूसरीकडे आज आपण युट्युब-नेटफ्लिक्स (सोशल स्ट्रीमिंग सर्व्हिस) वर नवीन चित्रपट सहजरित्या पाहू शकतो. पण मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी 24 वर्षांपूर्वीच सध्याच्या खोट्या बातम्या आणि सोशल स्ट्रीमिंग सर्व्हिसबाबत भविष्यवाणी केली होती. 

 

बिल गेट्स जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत वक्ती

1995 मध्ये बिल गेट्सने जीक्यू मासिकाचे पत्रकार टॅरी प्रॅशे यांना मुलाखत दिली होती. त्यावेळ गेट्स यांचे वय अवघे 39 वर्ष होते. फोर्ब्स मॅगझीनने त्यांना 12.9 बिलियन डॉलर (85 हजार कोटी रूपये)च्या नेटवर्थसोबत जगातील सर्वात श्रीमंतर व्यक्ती म्हणून निवड केली होती. पण आता गेट्स अॅमेझॉनचे जेफ बेजोसनंतर जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. बेजोसचे नेटवर्थ 99.6 बिलियन डॉलर (6.93 लाख रूपये) आहे. 

 

वीलीआर होणार गायब
प्रॅशेची बायोग्राफी लिहिणाऱ्याने मुलाखतीचा काही भाग सोशल मीडियावर केला पोस्ट
गेट्स आणि प्रॅशे यांच्यातील मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झालेला संवाद मार्क बरोस यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. बरोस हे प्रॅशेचे बायोग्राफी लेखक आहेत. गेट्सने त्यावेळी सांगितले होते की, इंटरनेट आपल्या मनोरंजनाच्या प्रकाराला बदलून टाकेल. आज (90 च्या दशकात) अनेक लोकांकडे चित्रपट पाहण्यासाठी वीसीआर किंवा डीव्हीडी प्लेअर आहेत. पण येणाऱ्या 10 वर्षांत हे सर्व काळाच्या पडद्याआड जातील. 


प्रॅशेने विचारले की, आज वीसीआर घरातील एक आवश्यक  असलेले वीसीआर खरंच लुप्त होतील का? यावर गेट्सने उत्तर दिले की, चार-पाच वर्षांत दुसरे डिस्क प्लेअर यांची जागा घेतील. यानंतर स्ट्रीमिंग व्हिडिओचा काळ येईल. याचे युझर्स वीसीआरला बकवास समजतील. बिल गेट्सच्या या मुलाखतीच्या 10 वर्षांनंतर यूट्यूबची स्थापना झाली. यानंतर 2007 मध्ये आम्ही चित्रपट आणि विविध शो ऑनलाइन दाखवणार असल्याची नेटफ्लिक्सने घोषणा केली. आज दर तासाला 2 अरबहून अधिक लोक यूट्यूबवर व्हिडिओ पाहतात.

 

गेट्सने फेक न्यूजचे पण केले होते भाकित
प्रॅशने विचारले होते की, येणाऱ्या काळात लोकं इंटरनेटचा उपयोग खोट्या बातम्या पसरवण्यासाठी मदत करतील का? यावर उत्तर देताना गेट्स म्हणाले की, इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात फेक न्यूज वाढतील. पण त्याचे सत्य तपासून घेण्याची संधी आपल्याकडे राहिल.
 

बातम्या आणखी आहेत...