आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 25 BJP Leaders And Ministers Quit Party After Candidature Denied In Lok Sabha 2019

Lok Sabha 2019: ईशान्य भारतात भाजपला दणका, तिकीट मिळत नसल्याने 25 नेत्यांनी पक्ष सोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच तिकीट मिळवण्यासाठी शक्तीप्रदर्शन आणि नाराजीतून बंडखोरीचे वारे वाहत आहेत. ईशान्य भारतात याच गोष्टीचा भाजपला मोठा दणका बसला आहे. ईशान्य भारतात उमेदवारीसाठी तिकीट मिळत नसल्याने नाराज 25 नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. एकट्या अरुणाचल प्रदेशातून 18 नेते आणि 6 मंत्र्यांनी राजीनामे दिले. हे सगळेच आता संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी, एनपीपीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा तोंडावर आल्या असतानाच सिक्कीमच्या एसकेएम आणि अरुणाचल प्रदेशातील कॉनराड संगमा यांच्या एनपीपीने भाजप सोडले.

 

गृहमंत्री, भाजप सरचिटणीसांचाही पक्षाला राम-राम
अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकर गमलिन, भाजपचे प्रदेश सरचिटणीस जरपुम गमबिन आणि सहा आमदारांनी सुद्धा पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कुमार वाई म्हणाले, "ते (भाजप) काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करतात. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाहा काय चाललंय! येथील मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना चक्क तीन-तीन तिकिट मिळाले आहेत." तर एनपीपी नेते थॉमस संगमा यांनी सांगितल्याप्रमाणे, "एनपीपी आता राज्यातील एकूण 60 जागांपैकी 30 ते 40 उमेदवार उभे करणार आहे. या सर्व जागा जिंकून राज्यात आम्हीच सत्ता स्थापित करणार आहोत." यासोबतच जारकर गमलिन यांनी पक्षाचा राजीनामा देताना आपल्याला तिकीट न मिळाल्याने नाराज आहोत असे सांगितले आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपने यापूर्वीच 54 जागांवर उमेदवारांची यादी जारी केली. तर एनपीपी बुधवारी आपले उमेदवारी जाहीर करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...