आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे बेथलेहम येथील 'चर्च ऑफ द नेटिव्हिटी', भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्म येथे झाला असल्याची मान्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रिलिजन डेस्क :  25 डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. तेव्हापासून ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीयांचा सर्वात मोठा सण मानला जातो. ख्रिसमस सण फक्त ख्रिश्चन धर्मीय नाही तर प्रत्येक धर्मातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असलेले चर्च आपल्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेच पण ते त्यांच्या सुंदरतेसाठी देखील ओळखले जातात.  आज आम्ही आपणास जगातील प्रसिद्ध 10 विशेष चर्चविषयी सांगत आहोत. 


1. चर्च ऑफ द नेटिव्हिटी (बेथलेहम, पलेस्तीनिअन टेरिटरीज)

हे चर्च इ.स 327 सालचे असल्याचे मानल्या जाते. हे चर्च खूपच सुंदर आणि विशेष समजले जाते. या ठिकाणी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला असल्याचे मानले जाते. त्यामुळे भव्यदिव्यता आणि सुंदरतेसोबत या चर्चला ऐतिहासिक असे महत्व प्राप्त झाले आहे. यूनोस्कोने या चर्चला जागितक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे. 

 

2. सँट बेसिल कॅथेड्रल (मॉस्को, रशिया)

रशियातील रेड स्क्वेअर येथे हे चर्च स्थापित आहे. 1555 ते 1561 दरम्यान या चर्चची निर्मीती करण्यात आली होती. हे चर्च मॉस्कोतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. याच्या सौंदर्यामुळे यूनोस्कोने याचा सुद्धा जागतिक वारसा स्थानांमध्ये समावेश केला आहे. 

 

3. नोट्रे डेम डी पॅरिस (पॅरिस, फ्रांस)

नोट्रे डेम कॅथेड्रल युरोपातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर चर्चपैकी एक आहे. याच्या भिंती, टॉवर, काच आदींवरील नक्षीकाम या चर्चला आणखीच आकर्षक बनवतात. नोट्रे डेम पॅरिसच्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. येथील चर्च या ठिकाणाला आणखीच विशेष बनवतात. 

 

4. सेंट पीटर्स बेसिलिका ( रोम, इटली)

इ.स 1506 ते 1615 दरम्यान सेंट पीटर्स बेसिलिका चर्चची निर्मीती करण्यात आली. याला जगातील मोठ्या चर्चपैकी एक मानले जाते. या चर्चची जमिनीपासूनची उंच जवळपास 163 मीटर आहे. या चर्चला रोममधील सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक मानले जाते. 

 

5. वेस्टमिंस्टर एब्बे (लंडन, इंग्लंड)

वेस्टमिंस्टर एब्बे लंडनमधील एक विशेण आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. लंडनमधील प्रसिद्ध वेस्टमिंस्टर पॅलेसजवळ हे चर्च स्थित आहे.  युनायटेड किंग्डममधील उल्लेखनीय धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ आहे. 10 व्या शतकात उभारण्यात आलेल्या या चर्चचा यूनोस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

 

6. सेंट पॉल कॅथेड्रल (लंडन, इंग्लंड)

सेंट पॉल कॅथेड्रल चर्च लंडनमधील डोंगराळ भागात स्थित आहे. येथील मूळ चर्च इ.स 604 मध्ये तयार करण्यात आले होते. पण कालांतराने ते विलुप्त झाल्याचे मानले जाते. आज स्थापित असलेल्या चर्चचा निर्माण 17 व्या शतकात केला असल्याचे सांगितले जाते. 

 

7. सग्रडा फमिलिअ (बार्सिलोना, स्पेन)

सग्रडा फमिलिअ चर्च अँटोनी गउड़ी नावाच्या कॅटलन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हे स्पेनमधील सर्वात मोठ्या कॅथोलिक चर्चमधील एक आहे. 1882 साली या चर्चच्या निर्मितीची सुरुवात करण्यात आली होती. सुंदरता आणि आकर्षण यामुळे यूनोस्कोने याचा जागितक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे. 

 

8. चर्च ऑफ द हॉली सेपुलछरे (यरुशलेम, इस्त्राईल)

हे चर्चला ख्रिश्चन धर्मीतील सर्वात महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी एक मानले जाते. कारण या जागेचा संबंध भगवान येशूसोबत असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार ज्या पर्वतावर हे चर्च आहे, त्याच पर्वतावर भगवान येशू यांना दफन केले असल्याचे मानले जाते. यामुळे या चर्चला पवित्र मानले जाते. 

 

9. सेंट मार्क बेसिलिका ( वेनिस, इटली)

हे चर्च वास्तुकलेचा अप्रतिम नमुना समजले जाते. वेनिस शहराची ओळख म्हणून या चर्चला मानले जाते. या चर्चचा निर्माण 1650 मध्ये गेला होता. हे चर्च प्राचीन आणि प्रसिद्धीसोबत खूपच सुंदर आहे. 

 

10. हागिया सोफिया (इस्तानबुल, तुर्की)

हागिया सोफिया जगातील प्राचीन आणि आकर्षक चर्च पैकी एक आहे. पण हे आता इस्तानबुलचे एक संग्रहालय आहे आणि यालाच एका चर्चच्या स्वरूपात ओळखले जाते. हे चर्च बीजान्टिन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. बीजान्टिन सम्राट जस्टीनिनद्वारे या चर्चची उभारणी पूर्ण करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...