आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटने आग लागून, पंचवीस एकर ऊस जळाला....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे सुमारे पंचवीस एकरांवरील ऊस जळाला. ही घटना सोमवारी कऱ्हेटाकळी शिवारात घडली. दोन तासांनंतर आग आटोक्यात आली. दुपारी काही शेतकरी उसाला पाणी देत असताना त्यांना शेजारच्या उसाला आग लागल्याचे दिसले. त्यांनी आग शमवण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने उसाला वेढा घातला. दोनशे-तीनशे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत पाच एकर उसाने पेट घेतला होता. ज्ञानेश्वर व गंगामाई साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. ज्ञानेश्वरचा बंब येईपर्यंत एक तास लागला. तोपर्यंत वीस एकर उसाला आग लागली होती. दोन-तीन तासांनंतर आग आटोक्यात आली. 


कामगार तलाठी व्ही. बी. खेडकर यांनी पंचनामा केला. ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी सुरेश आहेर, अशोक धस, पंडित गायके, विष्णू कोठुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेत जालिंदर कोठुळे, जालिंदर झिरपे, भारत गोबरे, आश्रू गोबरे, विष्णू कोठुळे, संभाजी काकडे, मीनाक्षी काकडे, संजीवनी गिते यांचा उस जळाला. 

बातम्या आणखी आहेत...