आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्राच्या जेवणातून कोरी येथे 25 जणांना विषबाधा, उपचारासाठी बीडच्या शासकीय रूग्‍णालयात हलवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- कारी (ता. धारूर) येथील सीताराम फडतारे यांच्या घरी पित्राच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२८) घडली. रात्री साडेआठनंतर त्यांना त्रास सुरू झाल्याने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बीडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. 


सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने सीताराम फडतारे यांच्या घरी जेवण होते. त्यांनी गावातील सव्वासे ते दीडशे लोकांना आमंत्रण दिले होते. दुपारी एकपासून पंगती बसल्या. दुपारी साडेतीन वाजेनंतर ज्योती फडतारे, तारामती धनवडे, सुवर्णा होगे, अश्विनी होगे, वाच्छला फडतारे, शारदा फडतारे, ज्ञानेश्वरी फडतारे, सीताराम फडतारे, धोंडाबाई फडतारे, कुशिवार्ता फडतारे, शिवराम फडतारे, हर्षदा फडतारे, शिवंम फडतारे, सुरज फडतारे, राणी फडतारे, दीपक फडतारे आदी २० ते २२ जन सीताराम यांच्या घरी जेवायला आले होते. त्यांना रात्री आठच्या दरम्यान उलटी, शौचाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे हा विषबाधेचा प्रकार असल्याचे जाणवल्याने सर्वजण माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून बीडच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. ज्योती फडतारे यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...