आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांनंतर एकाच तिमाहीत कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर आमचे नियंत्रण नसल्याचे सरकारच्या वतीने नेहमीच स्पष्ट करण्यात येते. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर भारतातील किमती निश्चित करतात. मात्र, या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आकडेवारीवर पाहिल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर लोकसभा निवडणूक आणि त्या माध्यमातून सरकारवरील परिणाम स्पष्ट दिसतो.  

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. ३१ मार्च रोजी चालू तिमाही संपणार आहे. पुढे दोन दिवसांतदेखील हा आकडा या पातळीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच एका तिमाहीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत एक चतुर्थांश वाढ होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये एकाच तिमाहीमध्ये झालेली ही सर्वाधिक वाढ असेल. याआधी २००९ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये ४० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली होती.

 
एकीकडे एक जानेवारीपासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे भारतात यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलचे भाव ६.०५ टक्के आणि डिझेलचे भाव ५.९५ टक्क्यांनी वाढले आहेत. यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली ही वाढ कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे, हे स्पष्ट होते.  
आेपेेकच्या उत्पादनात कपातीचा परिणाम  : मागील वर्षीच्या अखेरीस कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली होती. डिसेंबर तिमाहीमध्ये कच्चे तेल ३८ टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले होते. २५ डिसेंबर २०१८ रोजी कच्च्या तेलाच्या किमती ५०.७७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत कमी झाल्या होत्या. त्यानंतर पेट्रोलियम निर्यातक देशांची संघटना अोपेकने दर वाढवण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ओपेक देशांच्या या निर्णयाला रशियानेही सहमती दर्शवली होती. त्यानंतर या देशांनी प्रतिदिन १२ लाख बॅरल उत्पादन कमी केले. तेव्हापासूनच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. 


किमतीत आणखी वाढीची शक्यता  :  वर्ष २०१९ मध्ये पूर्व वर्षभर कच्च्या तेलाच्या उत्पादन कपात करण्यात यावी, अशी ओपेक देशांचे अघोषित नेतृत्व कर असलेल्या सौदी अरेबियाची इच्छा आहे. वास्तविक रशिया सप्टेंबरनंतर उत्पादन कपात कायम ठेवण्याच्या बाजूने नाही. पुढील धोरण ठरवण्यासाठी हे देश जूनमध्ये बैठक घेणार आहेत. जर उत्पादनात कपात कायम राहिली तर पुढील काळात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या बार्कलेज बँकेनुसार २०१९ मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत ७० ते ७५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 


निर्बंधांमुळेही किमतीत वाढ  : ओपेक देशांच्या वतीने कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये कपात केल्यानेच कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असे नाही. अमेरिकेच्या वतीने व्हेनेझुएला आणि इराणवर निर्बंध लादल्यानेही दरवाढ झाली आहे. हे देश मोठे पेट्रोलियम उत्पादक देश आहेत. मात्र अमेरिकेची बंधने असल्याने या देशांतून निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे.