आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात ४२ कोटींची थकबाकी; कर न भरणाऱ्या २५ मालमत्ता केल्या सील...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - विविध करापोटी जालना शहरातील नागरिक, प्रतिष्ठाने आणि मालमत्तांवर ४२ कोटींची थकबाकी झाली आहे. वसुली वाढवण्यासाठी नगर पालिकेने दहा जणांचे पथक स्थापन करून कर वसुली जोरात सुरू केली आहे.   दरम्यान, जालना शहरातील २० हजार मालमत्ताधारकांकडे १८ कोटींची थकबाकी आहे. वर्षभरात २५ मालमत्ता नगर परिषदेने जप्त करून त्या मालमत्तांवर  आपल्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत.  


जालना शहरात मालमत्ता, शिक्षण, पाणीपट्टी, रोहयो, वृक्ष, अग्निकर, पाणी, नळ असा विविध प्रकारचा  एकूण ४२ कोटींपर्यंत कर थकला आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या लोकांचा समावेश असल्याची यादीच पालिकेच्या वसुली पथकाकडे आहे. यात शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे. कर वसुलीचे प्रमाण कमी असल्याने शहरातील विकासकामांवरही परिणाम होत आहे. या करामुळे पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल, देखभाल दुरुस्ती खर्च भागवताना पालिका प्रशासनाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चालू वर्षात मार्चअखेर कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी नगरपालिकेच्या कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती सुरू केली.

 

दरम्यान, गत वर्षात शहरातील मालमत्ता धारकांकडे थकीत कर वसुलीसाठी गेले असता त्यांनी कर न भरल्याने जप्ती केली होती. अशा मालमत्तांचा लिलाव ९ मार्च २०१८ रोजी ठेवण्यात आला होता. परंतु, यास प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारानुसार मान्यता घेण्यात येऊन सदरील मालमत्तांवर नगर परिषदेची नावे लावण्यात आली आहेत. जप्ती कारवायांमुळे मालमत्ता कर वसुलीचा आकडा वाढत चालला आहे. 

बातम्या आणखी आहेत...