आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकसभेसाठी प्रत्येक बूथवर २५ प्रशिक्षित कार्यकर्ते नेमणार; भाजपची संघटनात्मक बांधणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अागामी लाेकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने संघटनात्मक बांधणीला प्रारंभ केला अाहे. दाेन्ही लाेकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र क्षेत्रप्रमुख, तालुक्यांसाठी विस्तारक, एका बुथसाठी २५ कार्यकर्ते अाणि मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी स्वतंत्र कार्यकर्ता ही या वेळच्या नियाेजनाची वैशिष्ट्ये असून संघटनात्मक बांधणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात अाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पक्ष कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. 


महापालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपने अाता जिल्ह्यातील दाेन्ही लाेकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले अाहे. लाेकसभा निवडणुकीच्या तयारीचे पहिले पाऊल टाकण्यात भाजपने श्रावण साेमवारचा मुहूर्त निवडून जबाबदाऱ्यांचे वाटप केले. भाजप कार्यालयात अायाेजित दाेन्ही मतदारसंघातील स्वतंत्र बैठकीत तयारीचा कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात अाला. १५ अाॅगस्टपासून पक्षीय संघटनेचा कालबद्ध कार्यक्रम लाेकसभा निवडणूक हाेईपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात अाली. १५ अाॅगस्ट राेजी ५०० ठिकाणी ध्वजाराेहण केेले जाणार अाहे. ३० ठिकाणी अामदार, खासदारांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात येणार अाहे. 


नवमतदार नाेंदणी, मतदार याद्यांचे वाचन, ३० अाॅगस्टपर्यंत ३३०० बुथप्रमुखांचे प्रशिक्षण, ३० अाॅगस्टनंतर मतदार यादीतील पान प्रमुखांचे प्रशिक्षण, २० सप्टेंबरपर्यंत ८५ ठिकाणी खासदार, अामदारांच्या उपस्थितीत मेळावे, १५ अाॅक्टाेबरपर्यंत तालुकास्तरावर बुथप्रमुखांचे अभ्यासवर्ग घेतले जाणार अाहेत. लाेकसभेच्या तयारीसाठी एक लाेकसभा क्षेत्रप्रमुख अाणि तालुक्याला विस्तारक काम करतील. याशिवाय सरकारी याेजनांची जनतेत माहिती पाेहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, संघटनमंत्री अॅड.किशाेर काळकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पाेपट भाेळे, सदाशिव पाटील, पी.सी. पाटील, सुनील नेेवे उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...