आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉटलंडच्या शाळेत एकाच वेळी शिकणार २५ जुळे विद्यार्थी; वेस्ट डनबार्टशायरच्या शाळांमध्ये वर्गात घेतला प्रवेश, शिक्षकांतही उत्सुकता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडिनबर्ग - स्कॉटिश कौन्सिल वेस्ट डनबार्टनशायरच्या शाळांमध्ये नवे सत्र सुरू झाले आहे. या वेळी २५ जुळ्या मुलांनी प्रवेश घेतला आहे. अशा अनोख्या प्रवेशामुळे विद्यार्थी व शिक्षकांत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहेत. या मुलांपैकी निम्मी मुले प्राथमिक व निम्मी माध्यमिक शाळांत शिकणार आहेत. गेल्या वर्षी कौन्सिलच्या शाळांत १४ जुळ्या मुलांनी प्रवेश घेतलेला होता. काही दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थी नवे गणवेश घेण्यासाठी शाळेत आले. त्यांनी बेल्समेयर कॅम्पसमध्ये नव्या वर्गमित्रांशी त्यांनी गप्पा मारल्या. कौन्सिलचे शैक्षणिक समुपदेशक  कॅरेन कॉनेगन यांनी सांगितले, शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थी व पालकांसाठी खास असतो. तो आपल्या भावंडांसोबत शेअर करणे खूप आनंददायी असते. मी वेस्ट डनबार्टनशायरच्या प्रत्येक शाळेत आलेल्या मुलांचे स्वागत करते. प्राथमिक वर्ग तुमच्या आयुष्यातील खूप दंगामस्ती करण्याचे दिवस असतात. सर्व मुलांना शाळेत शिकताना खूप उत्साह वाढेल. कौन्सिल प्रत्येक मुलांच्या अभ्यासाकडे व त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याकडे आवर्जून लक्ष देईल. मी सर्व मुलांना नव्या वर्गात प्रवेश घेतल्याबद्दल शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही माझ्या कायम शुभेच्छा राहतील, असे त्या म्हणाल्या.

स्पर्धक असले तरी एकमेकांची मदत करण्यास तयार असतात जुळे
शिक्षण विभागाचे निमंत्रक इयान डिक्सन यांनी सांगितले, उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर शाळा सुरू करणे मुलांसाठी खूप मोठा बदल असतो. सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकवर्गाचे पूर्ण सहकार्य राहिल. शाळेच्या दिवस आपल्या आयुष्यातील खूप चांगल्या आठवणीचे क्षण असतात. सर्व विद्यार्थी व सर्व जुळी मुले हे दिवस आनंदात काढतील, असा विश्वास वाटतो. जुळ्यांनी वर्गात शिकणे हा अनुभव खूप वेगळाच असतो. कारण दोघे एकमेकांचे स्पर्धक असले तरी एकमेकांना मदतही करतात. जर एक एखाद्या विषयात कमी असेल दुसऱ्याला तोच विषय खूप चांगला समजलेला असतो. तो आपल्या जुळ्या भावंडास समजावूनही सांगतो. गणवेश घेण्यास आलेल्या बहिणी जस्मिन व तामझीन हॅरिसन (१२) क्लाइडबँक हायस्कूलमध्ये शिकतात. जस्मिन म्हणाली, आम्ही दोघी खूप नर्व्हस आहोत. परंतु उत्सुकताही खूप आहे. मला होम सायन्स व कुकिंग विषय आवडतात. यासाठी हे विषय शिकणार आहे. माझे पापा शेफ आहेत. त्यांच्यासारखेच शेफ व्हायचे आहे. जस्मीन प्रमाणेच हॅना व लुईस या जुळ्या बहिणी वडिलांप्रमाणेच आयटी क्षेत्रात करिअर करणार आहेत.