आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 25 Villages On China Border Are Empty, After Cold, 20,000 People Will Return In April, Half Of Children's Half School Is On Top And Half Is On Down

चीन सीमेवर 25 गावे ओस, थंडीनंतर एप्रिलमध्ये परततील २० हजार लोक, मुलांची निम्मी शाळा वर, निम्मी खाली

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

धारचुला (पिथोरागड) : थंडी व उन्हाळ्यात वेगवेगळ्या राजधानीची व्यवस्था आपण ऐकली आहे. परंतु, चीन सीमेलगत उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात २५ हून अधिक गावांतील लोकांनी याच धर्तीवर दोन-दोन घरे बांधून ठेवली आहेत. एक थंडीच्या काळात, दुसरे उन्हाळ्यासाठी. उन्हाळ्यातील घरे कैलाश मानसरोवर रस्त्यावरील ब्यांस खोऱ्यात पर्वतांवर आहेत. तर, थंडीतील घरे १००-१५० किमी अंतरावर सखल भागात आहेत. वर नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी सुरू आहे. पाच ते सहा फूट बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे २० हजार लोक स्थलांतरित झाले आहेत.

  • ऑक्टोबरमध्ये डोंगराळ रस्त्यांवर हे लोक पायी जातात. गरजेच्या वस्तूच सोबत घेतात.
  • विवाहादी कार्यासाठी हवामानानुसार आपला पत्ता पाहुण्यांना देतात. मुलांचे शिक्षणही असेच. सहा महिने डोंगरावर, ६ महिने धारचुलामध्ये.