आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात 25 वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा खून, हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

सोलापूर- बेदम विजापूर नाका पोलिस स्टेशन हद्दीत शुक्रवारी प्रेमप्रकरणातून 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रदीप विजय अलाटला बेदम मारहाण करुन करण्यात आली, यात त्याचा जीव गेला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची मुले चेतन गायकवाड आणि तेजस गायकवाडवर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

असा आहे घटनाक्रम

प्रदीप अलाट हा राष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉलपटू होता. शहरातील कुमार चौकाच आई आणि लहान भावासोबत राहत होता. सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण द्यायचा. शुक्रवारी सकाळी तो घराबाहेर पडला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो घरी परत आला, मात्र लगेच घरातून निघून गेला. प्रदीप आपल्या प्रेयसीसोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरायला गेला असता आरोपींनी त्याला पाहिले आणि फोन करुन बोलावून घेतले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्रदीपने आपल्या मित्रांना फोन करुन काही जण आपल्याला मारहाण करत असल्याचे सांगितले. मित्र पोहचण्याच्या आधीच आरोपींनी प्रदीपला आरोपींनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनीच प्रदिपला रिक्षाने मोदी परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेले आणि तेथून पळ काढला.डॉक्टरांनी प्रदीपच्या मोबाईलने त्याच्या मित्रांना फोन करुन प्रदीपबद्दल माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी ही माहिती प्रदीपच्या कुटुंबीयांना दिली. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रदीपचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र आरोपींना पकडेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका प्रदीपच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...