आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ वर्षीय महिलेने दिला ५ मुलांना जन्म, प्रसूतीसाठी करावी लागली खूप दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - एक बाळंतपणात ५ मुलांच्या जन्म झाला. आनंद, दु:ख व आश्चर्याची ही घटना आहे. राजस्थानातील जयपूरमधील एका रुग्णालयात २५ वर्षीय रुख्साना या महिलेने पाच मुलांना जन्म दिला. खूप दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करावी लागली. प्रसूतीत तीन मुले व दोन मुलींचा जन्म झाला. यात एक मुलगा मृत जन्माला आला होता. उर्वरित चारपैकी एका नवजातास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. इतरांची प्रकृती चांगली आहे. मात्र, या सर्वांचे वजन कमी असल्याने डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या महिलेची ही तिसरी प्रसुती होती. डॉ. लता राजोरिया यांनी सांगितले, एकाचवेळी पाच मुले झाल्याने महिलेची ७ व्या महिन्यात प्रसुती झाली. यामुळे मुले अशक्त आहेत. स्वस्थ मुलांचे वजन २ ते साडेतीन किलो असते. यांचे वजन एक किलो ते १ किलो ४०० ग्रॅम आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गुजरातमध्ये एका महिलेने २०१२ मध्ये ११ मुलांना जन्म दिल्याचे उदाहरण आहे.