Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 25-year-old woman raped in nagar

२५ वर्षीय महिलेवर पुतण्याकडून बलात्कार; बाजरीच्या शेतात ओढत नेऊन केले दुष्कर्म

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 11:27 AM IST

घोगरगाव येथील डोंगरमाळ येथील २५ वर्षांच्या महिलेवर तिच्याच चुलत पुतण्याने बलात्कार केला. ४ सप्टेंबरला ही घटना घडली.

  • 25-year-old woman raped in nagar

    श्रीगोंदे- घोगरगाव येथील डोंगरमाळ येथील २५ वर्षांच्या महिलेवर तिच्याच चुलत पुतण्याने बलात्कार केला. ४ सप्टेंबरला ही घटना घडली. ही महिला गुरे चारत असताना तिला बाजरीच्या शेतात नेऊन बलात्कार करण्यात आला. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस तातडीने जेरबंद केले.


    आरोपीने महिलेचा हात पकडून बाजरीच्या शेतात ओढण्यास सुरूवात केल्यावर तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण त्या महिलेला बोलता येत नसल्यामुळे तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही. विरोध केला असता तिला या नराधमाने बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे ती शेतातच बराच वेळ अत्यवस्थ अवस्थेत पडून होती. काही काळाने सावरल्यावर रडत घरी जाऊन झालेला सर्व प्रकार तिने जावेला हातवारे करून सांगितला. नंतर तिच्या नातेवाईकांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर चुलत पुतण्याविरूद्ध बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे करत आहेत.


    अत्याचार करणारा नराधम प्रथमदर्शनी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. मात्र, तो अल्पवयीन नाही. वयाचे पुरावे शोधण्यासाठी तपासी अधिकारी कांबळे यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले, अशी माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

Trending