आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 25,000 Crore Sanctioned For Housing Projects Across The Country Says Union Finance Minister Nirmala Sitharaman

देशातील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना 25 हजार कोटी मंजूर, आर्थिक अडचणीत सापडलेल्या प्रकल्पांनाही फायदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कॅबिनेटने देशभरातील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी 25 हजार कोटी रुपयांचा फंड मंजूर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अल्टरनेटिव्ह इन्वेस्टमेंट फंड(एआयएफ)मध्ये 10 हजार कोटी रुपये सरकार देईल. इतर 15 हजार कोटी रुपये एसबीआय आणि एलआयसीकडून मिळतील.
सीतारमण म्हणाल्या की, देशभरात 4.58 लाख घरांचे 1,600 प्रकल्प रखडले आहेत. त्यांच्यासाठी एआयएफकडून फंड दिला जाईल. रोजगाराच्या संधी देणे आणि सीमेंट, आयर्न, स्टील इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढवण्यासाठी पाऊल उचलली जातील.
एआयएफच्या रकमेतही वाढ होईल. यात सॉवरेन आणि पेंशन फंड्समधून पैसे लावण्याच्याही शक्यता आहेत. सीतारमण यांनी सांगितल्यानुसार एनपीए घोषित झाले आहेत आणि आर्थिक अडचणीतून जात असलेल्या प्रकल्पांनाही याचा फायदा मिळे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबादसारख्या अनेक शहरात गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...