• Home
  • Hollywood
  • 26 year old actress is married to a 68 year old actor, learn what is the truth ...

Hollywood Special / 26 वर्षीय अभिनेत्री करत आहे 68 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न, जाणून घ्या काय आहे सत्य...


हॉलीवूड अभिनेत्री सेलेना गोमेज आणि अभेनेते बिल मुरे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत

दिव्य मराठी वेब टीम

May 22,2019 12:23:00 PM IST

हॉलीवूड डेस्क- हॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सेलेना गोमेज आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. खरतर, सेलेना गोमेजने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता आणि तिने रेड कार्पेटवरील काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्या फोटोजसोबत तिने कॅप्शन लिहीले की, ती आपल्या 68 वर्षीय सह-अभिनेता बिल मुरेसोबत लवकरच लग्न करणार आहे. सेलेनाच्या या पोस्टने तिच्या फॅन्सना चकित करून सोडले आहे, यानंतर फॅन्सनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.


काय आहे सत्य...?
सेलेनाच्या या पोस्टवर नीट लक्ष दिले तर समजेल की, तिची ही पोस्ट मस्करीत टाकलेली होती. खरतर, 26 वर्षीय सेलेना 'द डेड डोन्ट लाई' (The Dad Don't Lie) या तिच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठीच तिने 72व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. सेलेनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कान्सच्या रेड कारपेटवरील काही फोटोज शेअर करत आपल्या फिलींग्स शेअर केल्यात. तिने कॅप्शनमध्ये लिहीले, 'कान्समध्ये मी पहिल्यांदा भाग घेतला आहे, मला या चित्रपटाचा भाग होऊन खूप गर्व वाटत आहे.' यासोबतच तिने मस्करीत 68 वर्षीय को-स्टार बिल मुरेबद्दल लिहीले 'आणि हो, मी आणि बिल मुरे लवकरच लग्न करणार आहोत.'

X
COMMENT