आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांपुर्वीचा 'उंबरठा' चित्रपट पाहून मुजफ्फरपुर बालिकागृह कांडची घटना येते डोळ्यांसमोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना : मुजफ्फरपुरच्या बालिकागृहातील घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. समाजातील वस्तुस्थिती या घटनेतून दिसते. तुम्ही असा कोणता चित्रपट पाहिला आहे का, ज्यामध्ये मुंबईच्या टाटा इंस्टीट्यूटची चर्चा असेल, महिला सुधाल गृहासंबंधीत कथा असेल, या कथेत पत्रकार आणि आमदारही असतील. दोन मुलींनी आत्महत्या केली असेल. गृहातून प्रत्येक रात्रीला मुली समाजातील प्रतिष्ठीत लोकांना पाठवण्यात येत असतील. 26 वर्षांपुर्वी आलेल्या उंबरठा या मराठी चित्रपटात हे सर्व आहे. स्मिता पाटील, गिरिश कर्नांड यांनी यामध्ये अभिनय केला आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये 'सुबह' नावाने तयार करण्यात आला होता. कलाकार तेच होते. जब्बार पटेल यांनी चित्रपटाचे डायरेक्शन केले होते. चित्रपटाला बेस्ट फीचर फिल्म आणि स्मिता पाटीलला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

 

अनेक घोटाळ्यांचा खुलासा, गृहाची चेअरमन इंटरेस्ट घेत नाही
सुमित्रा महाजन(स्मिता पाटील)चे लग्न एक वकील सुभाष(गिरीश कर्नाड) सोबत होते. ती मुंबईच्या टाटा इस्टीट्यूट(टिस)मधून सोशल वर्कमध्ये डिप्लोमा करते. यानंतर ती संगमवाडी नावाच्या गावात महिला सुधारगृहात सुपरिटेंडेट पदाची नोकरी करते. तिला एक मुलगी आहे. पण पतीसोबत जाऊ देत नसल्यामुळे ती नंदेच्या भरवश्यावर मुलीला सोडून जाते. महिलागृहात आल्यानंतर ती अनेक सुधारणा करते. अनेक प्रकारचे घोटाळे समोर येतात. चेअरमनकडे ती तक्रार करते, परंतू तो यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. सुमित्रा तिच्या पातळीवर अनेक सुधारणा करते. एका रात्री सुमित्राला स्थानिक आमदाराचा फोन येतो. तो म्हणतो की, गाडी पाठवली आहे, एक चांगली मुलगी पाठवून द्या. सकाळपर्यंत परत येईल. हे ऐकल्यानंतर सुमित्रा फोन रागात ठेवते.

 

महिला सुधारगृहात पीडितांना न्याय मिळत नाही
एकदा गृहामध्ये एका केसवर सुनावणी सुरु असते. सुभद्रा ही पीडिता बिहारची असते. ती एक तरुण शिवचरणसोबत पळून गेली असे सांगितले जाते. पतीने तक्रार केल्यानंतर तिला पकडण्यात येते. चेअरमन सुनावतात की, तुला पतीजवळ जावे लागेल. यावर सुभद्रा नकार देते. नंतर उपला जोशी येते. वडील डॉक्टर आहेत. उपलाला मुलगीही असते. वडील तिला घेऊन जाण्यास तयार असतात. परंतू त्यांना वाटते की, तिने मुलीला स्वतःपासून वेगळे ठेवावे. उपला म्हणते की, मी माझ्या मुलीला सोडणार नाही. नंतर ती मुलीला मारुन टाकते आणि म्हणते की, आता तर मला येथून जावे लागणार नाही ना.

 

नायिका घरी परतते परंतू नव-याचा सपोर्ट मिळत नाही
एकदा गृहातील दोन महिला चंदा आणि फुलवा पळून जाण्याचा प्रयत्न करतात. परंतू त्यांना जाऊ दिले जात नाही. नंतर त्या आत्महत्या करतात. यानंतर सुमित्राला घेरले जाते. तिला फोनवर धमक्या मिळतात. सुमित्रा परत घरी येते. पती सांगतो की, त्याचे दूस-या महिलेसोबत संबंध आहेत. तो म्हणतो की, तु सोबत राहू शकते परंतू तुला समजोता करावा लागेल. सुमित्रा तयार होत नाही आणि पुढच्या प्रवासाला निघते. 

बातम्या आणखी आहेत...