आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये राहणार 26 वर्षांचा एक मिलेनियर आपल्यासाठी एक पर्सनल असिस्टंट शोधत आहे. असिस्टंटचे काम जगभरात पसरलेल्या त्याच्या बिजनेसला सांभाळण्यात त्याची मदत करणे असेल. या कामाच्या बदल्यात यशस्वी कँडिडेटला वर्षाचा पगार म्हणून 35 लाख रुपये दिले जातील. यासोबतच कामाच्या निमित्ताने जगभरात फिरणे आणि लग्झरी हॉटेलमध्ये राहणे खाणे फ्री असेल.
पगारासोबत मिळतील हे फायदे...
- सिडनीचा राहणारा मॅथ्यू लेपरेची प्रत्येक महिन्याची कमाई 82 लाख रुपये आहे. त्याचा ई-कॉमर्सचा बिजनेस अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. मागच्यावर्षीच तो जापान, दुबई आणि हवाईचा दौरा करून परतला आहे.
- सध्या तो अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, ज्यामुळे इतरांनाही करियर घडवण्याची संधी मिळत आहे. मात्र, पगारानुसार पर्सनल एक्सपीरियन्स देखील पहिला जाईल.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडलेल्या कँडिडेटच्या अनुभवानुसार त्याला पगार दिला जाईल. यासोबतच ट्रॅव्हलिंग आणि राहण्यासाठी हॉटेलचा खर्च वेगळा दिला जाईल.
- निवडलेल्या कँडिडेटला हेल्थ इंश्योरेंस बेनेफिट्सदेखील मिळतील. मॅथ्यूने दिलेल्या जाहिरातीनुसार, निवडलेल्या कँडिडेटला कामबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतीचाही अनुभव घायला मिळेल.
जॉबसाठी कँडिडेटमध्ये हवे हे गुण...
- मॅथ्यू म्हणाला, ''कामादरम्यान मी जसे फिरतो तीच संधी मी आपल्या पर्सनल असिस्टंटलाही देईन''. मात्र केवळ फिरण्याची हौसच या जॉबसाठी पुरेशी नाही.
- जाहिरातीनुसार, या जॉबसाठी कँडिडेटला कम्प्युटरची संपूर्ण ज्ञान, सोशल मीडियाची ताकद ओळखणारा ऑर्गनाइज्ड आणि एम्बीशियस (महत्वाकांक्षी) पाहिजे.
- मॅथ्यूने 23 वर्षे वयात यूनिवर्सिटी सोडली होती कारण त्याला काहीतरी स्वतःचे काम करायचे होते. आता तो आपले चार यशस्वी ई-कॉमर्स स्टोअर चालवत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.