आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुम्ही येऊ नका, मी सांभाळून घेईल..\', 26/11च्या हल्ल्यात दहशदवाद्यांसोबत लढताना शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे होते हे शेवटचे शब्द..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात दहशदवाद्यांसोबत लढताना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते. "तुम्ही सगळे नका येऊ, मी सांभळून घेईल" एवढे बोलून संदीप यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या शब्दांमुळे त्यांच्या ट्रूप कमांडोजवर प्रचंड परिणाम झाला. ताज हॉटेलमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्‍यासाठी संदीप हे एनएसजी कमांडोजच्या टीमचे नेतृत्त्व करत होते. संदीप यांच्या वडिलांनी एका इंटरव्ह्यूमध्ये मुलाच्या आयुष्यातील काही खास गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संदीप त्याची सॅलेरी दान करायचा....

 

नेहमी जिंकण्याचा होता स्वभाव

- संदीप यांचे वडील रिटायर्ड इस्रो ऑफीसर आहेत. त्यांनी सांगितले की, ''संदीपचा स्वभाव नेहमी जिंकण्याचा होता. संदीपला सचिन तेंडुलकर खुप आवडायचा.  ज्याप्रमाणे सचिन कधी हार मानत नव्हता, त्याप्रमाणेच संदीपही कधी हार मानायचा नाही. परंतु भारताचा पराभव झाला की तो प्रचंड दु:खी व्हायचा. भारतीय संघ कायम जिंकावा, असे संदीपला वाटायचे. कधी इस्रोचा एखादा प्रोजेक्ट फेल व्हायचा, तो माझ्याजवळ येऊन मला आधार द्यायचा. त्याला पराभव मान्य नसायचा.''
 
- पुढे ते म्हणाले, संदीपचे राष्ट्रावर खूप प्रेम होते. त्याला देशासमोर कोणीच महत्त्वाचे नव्हते.

 

-तो नेहमी अशा लोकांचा विरोध करायचा जे स्वत:ला देशप्रेमी म्हणतात, आणि देशाकडून कसा स्वत:चा फायदा होईल याचाच विचार करातात.

 

संदीप दान करायचा संपूर्ण पगार..

- संदीप प्रचंड दानशूर होता. त्याला दीनदुबळ्‍यांची मदत करायला आवडायचे. संदीप त्याच्या पगाराचे काय करतो, हे त्याच्या वडिलांना माहीत नव्हते. परंतु, एके दिवशी त्यांनी संदीपचा बँक बॅलेंस चेक केला. तेव्हा त्यांना समजले की, संदीप आपला संपूर्ण पगार गोरगरीबांना दान करतो, असे संदीपच्या वडिलांनी सांगितले.

 

- संदीप यांच्या एका सहकार्‍याने सांगितले की, संदीपने त्याच्या आईच्या आजारपणाचा सर्व खर्च केला होता. त्यासोबतच तो नेहमी अनेक सेवाभावी संस्थाना मदतही करत होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शहीद एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्‍णन् यांचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...