आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- मुंबईवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज (26 नोव्हेंबर) 11 वर्षे पूर्ण झाले. या हल्ल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक गंभीर जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, शहीद होता होता मुंबई पोलिस दलाला 9 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले. तुकाराम ओंबाळे या पोलिस अधिकार्याने पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडून दिले होते. पाकिस्तानविरोधातील कसाब हा सर्वात मोठा पुरावा, होता.
ओंबाळे यांच्यामुळे कसाब जिवंत मिळाला
दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्यानंतर ओंबाळे यांना वॉकी-टॉकीवरून संदेश आला. दहशतवादी चौपाटीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत निघाले आहेत. हल्ला झाला तेव्हा वेळी ओंबाळे चौपाटीवर ड्यूटीवर होते. ओंबाळे व आणखी एक सहकारी चौपाटीवर पोहोचले. तेवढ्याच कसाब व त्याच्या साथीदारांची गोळीबार करीत गाडी येत होती. जेव्हा कसाब व त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहोचले तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला अडविले व पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाबच्या साथीदाराने ओंबाळेवर गोळ्या झाडल्या. मात्र त्यावेळी कसाबला टाकून त्याचे साथीदार गाडीत पळून गेले. या हल्ल्यात दहशतवाद्यांना कडवा लढा देऊन त्यांचा प्रतिकार माघारी परतवण्यात मोठी भूमिका बजावली ती पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी. ओंबाळे यांनी चौपाटीवरच प्राण सोडला मात्र त्यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात यश आले.
ओंबाळेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानविरोधात भक्कम पुरावे मिळाले
कसाब जखमी अवस्थेत तेथेच पडून राहिला. त्यामुळे पोलिसांना कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळाले. पुढे कसाबमुळेच हा खटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला व भारताने पाकिस्तानचे पितळ उघडं पाडले. याचबरोबर हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये सरकारने फासावर लटकवले. त्यामुळे ओंबाळेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी त्यांच्या धाडसामुळे कसाब हाती लागला. ओंबाळेंच्या या कर्तृत्वामुळे 26 जानेवारी 2009 रोजी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
पुढील स्लाइडवर पाहा- तुकाराम ओंबाळेंचे फोटो
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.