आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला दहशतवादी हल्ला आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. या हल्ल्याच्या खुणा आजही पाहायला मिळतात. या हल्ल्यात 166 निर्दोष लोकांना त्यांचा जिव गमवला आणि शेकडो लोक जखमी झाले होते. देशातील या सर्वात मोठ्या हल्ला करणाऱ्या 10 दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत राहिलेला दहशतवादी अजमल कसाबला 2012 मध्ये फाशी देण्यात आली. देविका रोटावन (त्यावेळी ती 9 वर्षे 11 महीन्यांची होती) या हल्ल्याची सर्वात कमी वयाची साक्षीदार झाली होती. देविकाने दिलेल्या साक्षीमुळे कसाबला फाशी झाली होती. परंतु तरीही काही लोक देविकाला 'कसाबची मुलगी' म्हणुन हिणवु लागले. देविका आता 18 वर्षांची झाली असुन तिला आयपीएस अधिकारी होऊन भारताची सेवा करायची आहे. या हल्ल्यानंतर देविकाच्या आयुष्यात काय परिणाम झाले आणि तिला कशाप्रकारे संघर्ष करावा लागला त्याविषयी माहीती...
> देविका सांगते, 'हल्ल्यानंतर मला अनेक गोष्टींशी संघर्ष करावा लागला. मला आणि माझ्या कुटुंबियांना राहण्यासाठी घर मिळत नव्हते. आम्ही जिथे राहत होतो त्या ठिकाणी मला कसाबची मुलगी म्हणुन हिणवण्यात आले. लोकांमध्ये माझी ओळख 'कसाबची मुलगी' अशीच झाली होती.
> देविका सांगते, मी आणि माझे कुटुंबिय कधीच त्या काळ्या रात्रीला विसरु शकत नाही. मी माझे वडील आणि माझा भाऊ आम्ही सीएसटी स्टेशनवर पोहचलो होतो. तिथे आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वर रेल्वेची वाट पाहत होतो. त्यानंतर माझा भाऊ टॉयलेटला जात असल्याचे सांगुन तिथुन निघुन गेला आणि काही वेळेतच तिथे गोळीबार सुरु झाला. गोळीबारात माझ्या पायाला गोळी लागल्याने मी बेशुद्ध झाले होते. त्यानंतर मी शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पीटलमध्ये होते. तिथे माझ्यावर एक महिना उपचार सुरु होते. या हल्ल्यानंतर माझ्या वडिलांना पाकिस्तानवरुन अनेकवेळा फोन आले. आम्हाला पैशांचे आमिष दाखवून साक्ष बदलण्यासाठी धमकवण्यात आले होते. आम्ही विरोध केला त्यानंतर आमच्या कुटुंबाला मारण्याच्या धमकीचे फोन सरू झाले. परंतु न घाबरता मी न्यायालयात कसाबविरुद्ध साक्ष दिली.
नातेवाईकांनी संबंध तोडले
> न्यायालयात कसाबविरुद्ध साक्ष दिल्यानंतरही देविकाच्या नातेवाईकांनी तिच्या कुटुंबियांशी संबंध तोडले.
> देविका सांगते, 'तेव्हा आम्हाला खुप वाईट वाटत होते. मी सतत विचार करत होते की, आम्ही कोणता गुन्हा केला आहे ज्यामुळे आजही आम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागते आहे. नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असला तरी आम्हाला घराबाहेर थांबावे लागत होते.
> एका अहवालानुसार, हल्ल्याच्या 4 वर्षानंतरही देविकाला कोणत्याही शाळेत अॅडमिशन मिळाले नव्हते.
टिबी या आजारने त्रस्त झाली देविका
सरकारने आणि अनेक सामाजिक संस्थांनी देविका आणि तिच्या कुटुंबियांना मदत केल्याचे दावे केले. परंतु कोणाकडुनही त्यांना मदत मिळाली नाही. वर्षानुवर्षे देविकाच्या कुटुंबियांची परिस्थीती बिघडत गेली. अचानक देविकाला टीबी झाल्याने तिच्या संघर्षात आणखीनच वाढ झाली.
वडीलांचा व्यवसायही ठप्प झाला
देविकाचे वडील नटवरलाल रोटावन दक्षिण मुंबईमधील कुलाबादेवी परिसरात ड्रायफ्रूटचा व्यवसाय करत होते. हल्ल्यानंतर त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. दहशतवाद्यांच्या धाकाने लोकांनी नटवरलाल यांच्याशी संबंध तोडले त्यामुळे व्यवसाय बंद झाला.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
देविकाला या हल्ल्यानंतर अनेक पुरस्कारही मिळाले. तिने कमी वयात न्यायालयात साक्ष दिल्याने अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी देविकाचे कौतुक केले. तेव्हापासुन देविकाने भारतीय पोलिससेवेत काम करण्याचा निर्धार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.