आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिलवाडा - २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी १० वर्षे पूर्ण झाली. त्याचे निमित्त साधून भाजप आणि काँग्रेसने परस्परांवर आगपाखड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भिलवाडा येथील प्रचार सभेत म्हणाले की, मुंबई हल्ला झाला तेव्हा केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकार होते. दिल्लीत मॅडमचे (काँग्रेस नेत्या सोनिया गांधी) रिमोट कंट्रोलने राज्य सुरू होते. दहशतवाद्यांनी हल्ला करून आपल्या देशाच्या सामान्य नागरिकांना आणि जवानांना ठार केले. त्या वेळी राजस्थानमध्ये प्रचार मोहीम सुरू होती. कोणी अतिरेकी हल्ल्यावर टीका केली की राजदरबारी उसळत असत. बोलणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावत असत. राजदरबारी काँग्रेसने लिहिलेली कथा वाचत असत. लष्कराने जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा काँग्रेसने म्हटले की, सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ दाखवा. सैनिक काय हातात कॅमेरा घेऊन शत्रूशी लढण्यास जातील का?मोदींना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सैनिकांचे बलिदान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण करणे हीच भाजपची भूमिका आहे. पण पंतप्रधान मोदी आणि भाजपने हे विसरू नये की काँग्रेसच्या सरकारच्या काळातच दहशतवादी कसाबला फासावर चढवण्यात आले होते. डेव्हिड हॅडलीला ३५ वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
मेघालयाचे राज्यपाल म्हणाले-अतिरेक्यांनी मुस्लिमांना मारले नाही
शिलाँग | मेघालयाचे राज्यपाल तथागत राय यांनी ट्विट केले-२६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुस्लिम वगळता सर्व निष्पापांना मारले होते. आपण पाकशी कूटनीतिक संबंध थोडे तरी कमी केले असे वाटते का? हे संबंध तोडले जावे किंवा युद्धास तयार राहावे. राय यांच्या ट्विटवर टीका झाल्यावर त्यांनी ते डिलीट करत माफी मागितली. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, २६/११ हल्ल्यात पाक अतिरेक्यांनी मुस्लिमांना सोडले होते, अशी माहिती मला मिळाली होती. वक्तव्याबद्दल माफी मागतो.
२६/११ चा कट रचणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास अमेरिकेचे ३६ कोटींचे बक्षीस
वॉशिंग्टन | २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या कट कर्त्यांनी माहिती देणाऱ्याला अमेरिका ३६ कोटी रु. चे बक्षीस देणार आहे. अमेरिकेच्या रिवॉर्ड फॉर जस्टिस डिपार्टमेंट (आरएफजे) ही घोषणा केला. आरएफजेने म्हटले आहे की, कट रचणाऱ्यांची ओळख पटू शकेल, कट रचणाऱ्यांना अटक करणे सोपे व्हावे अशी माहिती असावी. आरएफजेने अमेरिकेला आपल्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांसोबत दोषींची ओळख पटवण्याचा सल्ला दिला. आरएफजेने म्हटले की, हल्ल्याशी संबंधित माहिती वेबसाइट, ई-मेल, फोनने किंवा थेट दूतावासाच्या विभागीय अधिकाऱ्याला दिली जाऊ शकते. तत्पूर्वी, २०१२ मध्येही आरएफजेने हाफिज सईद, हाफिज अब्दुल रहमान मक्कीसह इतर अतिरेक्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची घोषणा केली होती. २००१ मध्ये लष्कर-ए-तोयबाला विदेशी अतिरेकी संघटना मानले होते. मे २००५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 'लष्कर'ला प्रतिबंधित संघटना मानले होते. दोन आठवड्यांआधी पीएम नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांना भेटले होते. तेव्हा पेन्स यांनी मुंबई हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना शिक्षा न मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.