आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2625 Players Participated In Play India Within 2 Years; Olympic Trio Wins By Three; 42 Crore Spent

खेलाे इंडियात 2 वर्षांत 2625 खेळाडू सहभागी; तिघांनी दिला ऑलिम्पिक काेटा; 42 काेटी खर्च

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी गत वर्षांपासून नवीन माेहिम हाती घेण्यात आली आहे. याच माेहिमेचा आता पुढच्या वर्षी तिसऱ्या सत्रात पदार्पण हाेत आहे. खेलाे इंडिया या माेहिमेच्या माध्यमातून देशातील क्रीडा क्षेत्राच्या गुणवंत खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना मिळत आहे. आता याच खेलाे इंडियाच्या तिसऱ्या सत्राच्या स्पर्धेचे जानेवारीमध्ये आयाेजन करण्यात आले. या स्पर्धेच्या तिसऱ्या सत्राची दाेन गटांत विभागणी करण्यात आली. यातील युथ गेम्सचे जानेवारीत आयाेजन केले जाईल. त्यानंतर खेलाे इंडिया युर्निव्हसिटी गेम्सचे आयाेजन फेब्रुवारीमध्ये हाेईल.

गत दाेन वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील २६२५ खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली. यातील १३१२ खेळाडूंना ९९ खेलाे इंडियाच्या अकादमी व सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी आतापर्यंत ४२ काेटींचा खर्च करण्यात आला आहे.

गेम्सच्या प्रत्येक वर्षी नव्या खेळाचा समावेश

खेलो इंडियामध्ये दरवर्षी नव्या खेळाचा समावेश केला जाताे. क्रीडा मंत्रालयाच्या वतीने यजमान राज्याच्या एका खेळाला मान्यता देते. यातून त्या राज्यातील खेळाच्या प्रसार व प्रचाराला चालना मिळण्यास मदत हाेते. गत दाेन सत्रांत १६ खेळ हाेते. आता यूथ गेम्समध्ये १८ खेळांचा समावेश आहे. यंदाच्या या स्पर्धेत आता सायकलिंग व लाॅन बाॅलचा समावेश करण्यात आला आहे.

खेलाे इंडियाची जेरेमी यूथ ऑलिम्पिकची चॅम्प

खेलो इंडियाने देशाला यूथ ऑलिम्पिक चॅम्पियन दिला आहे. या स्पर्धेच्या वेटलिफ्टर जेरेमीने गत वर्षी यूथ ऑलिम्पिक स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. याशिवाय नेमबाज मनु भाकर, सौरभ चौधरी व स्विमर श्रीहरि नटराज सारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले आहेत.

गेम्समध्ये टाॅप-८ खेळाडू व संघ सहभागी

नॅशनल स्कूल गेम्स आणि वेगवेगळ्या खेळांतील असाेसिएशनच्या राष्ट्रीय स्पर्धेतून नॅशनल स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडू वा संघ या गेम्ससाठी पात्र ठरतात. या टाॅप-८ खेळाडू आणि संघातील अव्वल खेळाडूंची स्काॅलरशिपसाठी निवड हाेते. नॅशनल स्कूल गेम्स, नॅशनल चॅम्पियनशिप आणि युनिर्व्हसिटी गेम्समधून दरवर्षी एक हजार खेळाडूंना ८ वर्षांपर्यंत प्रत्येकाला ५० लाख दिले जातात.

१४ वर्षांखालील खेळाडूंसाठी आता स्पाेर्ट््स स्कूल तयार हाेणार : साई

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल संदीप प्रधान यांनी आगामी काळातील युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठीच्या याेजनेची माहिती दिली. युवा गटातील खेळाडूंमधील टॅलेंट हंटच्या शाेधासाठी आता खेलाे इंडिया स्पाेर्ट््स स्कूल तयार केले जाणार आहेत. यामध्ये १४ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश असेल. याच्या पायलट प्राेजेक्टसाठी चार केंद्रीय विद्यालयाने दत्तक घेण्यात आले. याठिकाणी ९० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

प्रश्न : खेलो इंडियामध्ये १२, १५, १९ वर्षांखालील गटांचा समावेश का करण्यात आला?

उत्तर : सध्या १७ वर्षाखालील खेळाडू हे २०२८ च्या ऑलिम्पिकपर्यंत पुर्णपणे तयार हाेतील. एकाच ठिकाणावरून विविध वयाेगटातील स्पर्धेचे आयाेजन करणे कठिण आहे. त्यामुळे आम्ही नव्याने युवांच्या गटात वयाेगटाचा समावेश केला. याशिवाय आता पुढच्या वर्षी आम्ही शालेय, विद्यापीठ आणि ओपन गेम्समधूनही गुणवंत खेळाडू निवडणार आहाेत.

प्रश्न : युवा गटासाठी साईची काय माेहीम ?

उत्तर : ८ ते १४ वर्षांपर्यंत खेळाडूंचा टॅलेंट हंट आम्ही ऑनलाइन फिटनेस एसेसमेंट प्लेटफॉर्मच्या माध्यमातून केले. यात १० लाखांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले. आता यामध्ये वेगाने वाढ हाेईल. यातून आम्ही गुणवत्ता असलेल्या युवा खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून तयार करू शकणार आहाेत.
 

बातम्या आणखी आहेत...