आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकशाही दिनात २६४ तक्रारी; वाळूतस्करीचा विषयही तापला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव - अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस व महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते; परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लोकशाही दिनात नाराजी व्यक्त केली. तसेच अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी आरटीओंना दिल्या. यामुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन अवैध वाळू वाहतूक तसेच ठेवीदारांच्या प्रलंबित तक्रारींवरून चांगलाच गाजला. 

 

जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन साेमवारी झाला. यात सहकार, जिल्हा परिषद, मनपा, महसूल, कृषी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलिस यासह इतर विभागांच्या २६४ तक्रारी दाखल झाल्या. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तापी, गिरणा, वाघूरसह अनेक नदीपात्रातून नियमबाह्यपणे वाळूचा सर्रास उपसा सुरू अाहे. गावागावातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पाेलिस व महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून या कारवाईस याेग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला. त्यामुळे हा जिल्हास्तरीय लाेकशाही दन वाळू तस्करी व ठेवीदारांच्या विषयांवर गाजला हे विशेष हाेय. 

 

ठेवीदारांच्या तक्रारींवर ठोस कार्यवाही नाही 

लोकशाही दिनी ठेवीदारांच्या अनेक तक्रारी येत असतात; परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तक्रारी तालुक्याला पाठवण्यात येतात. अडचणीतील पतसंस्थांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई झालेली नसल्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिल्या. जिल्हा परिषदेकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. त्याच-त्या तक्रारी येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी सांगितले. 


तक्रारी स्वीकारण्याचे बदलवले स्वरूप

नियोजन भवनात बाहेरील जागेत शासकीय विभागनिहाय टेबल लावण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महसूल, उपजिल्हा निबंधक, आरटीओ, पोलिस आदींचा समावेश होता. दरवेळी संबंधित लिपिक तक्रार घेऊन तक्रार क्रमांक तक्रारदारास देतात. सोमवारी स्वतः जिल्हाधिकारी तक्रारी घेण्यास बसले. नागरिकांच्या तक्रारीही एकूण घेतल्या. तक्रारदारांना नियोजन भवनात जाऊन बसण्यास सांगितले. सर्व तक्रारी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर हे अधिकाऱ्यांसह सभागृहात आले. त्यांनी तक्रारदारांना लवकरात लवकर तक्रार सोडवण्याचे आश्वासन दिले. 

 

बातम्या आणखी आहेत...