आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते राहिले नाही मग मी जिवंत राहून काय करू, दोन पानाचे सुसाइड नोट लिहून मुलीने केली आत्महत्या, 2 दिवसांपूर्वी प्रियकराने सुसाइडचा लाइव्ह व्हिडिओ बनवून दिला होता जीव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- ग्रेटर नोएडाच्या सूरजपूरमध्ये राहणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. युवतीच्या आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या युवकाने लाइव्ह करून आत्महत्या करून जीव दिला होता. कुटुबीयांनी लग्नाला विरोध केल्यामुळे मंगळवारी प्रियकराने आत्महत्या केली होती, त्यानंतर युवतीला मानसिक त्रास झाला आणि तिनेही टोकाचे पाउल उचलले. गुरूवारी तिने दोन पानाचे सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. त्यात तिने लिहीले, तो नाही राहिला मग आता मी तरी राहून काय करू.


लग्नाविना राहत होते सोबत

मृत युवती निशा(27) आपल्या प्रियकर अमित सिंहसोबत सूरजपूरमध्ये किरायाच्या घरात 6 महिन्यांपासून राहत होते. दोघेही वेगळ्या जातीचे होते, त्यामुळे लग्नाला घरच्यांचा विरोध होता. अमित एका खासगी कंपनीत नोकरी करत होता, मागील काही दिवसांपासून अमितच्या घरचे त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. यामुले त्रस्त होउन अमितने मंगळवारी बिलासपूरमध्ये लाइव्ह करून विषारी पदार्थ खाल्ला होता, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमितने अमितच्या या सुसाइडमुळे निशाच्या मनाला खुप आघात झाला होता, त्यानंतर तिनेही गुरूवारी आत्महत्या केली.
 

बातम्या आणखी आहेत...