आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 27 Years Of Suadagar Release Raajkumar Was Quitting The Film Due To Up Bihari Dialect

सौदागरची 27 वर्षे: दिलीप कुमार यांचा यूपीचा लहेजा ऐकून शूटिंग सोडून गेले होते राजकुमार, असेच 3 किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांचा सौदागर चित्रपट आला होता. परंतू त्याच्या 18 वर्षानंतर 1991 मध्ये शो मॅन सुभाष घई हे याच टायटलमध्ये अजून एक चित्रपट घेऊन आले. दोन जीवलग मित्र एकमेकांचे वैरी कसे बनतात याची कथा यामध्ये होती. सुभाष घई जेव्हा या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी दिलीप कुमार आणि राज कुमारकडे गेले होते तेव्हा तिथे एक मजेदार किस्सा घडला होता. या दोन्ही लीजेंड्री अॅक्टर्सला चित्रपटात काम करण्यास सुभाष घईंनी कसे तयार केले हा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगतिला होता.

 

सौदागर चित्रपटांचे 3 न ऐकलेले किस्से 

 

राजकुमार यांना तयार करण्यास लागले होते 2 तास 
शूटिंगवर पोहोचताच राजकुमार यांनी पाहिले की, दिलीप कुमार यूपी-बिहारी लहेज्याच्या हिंदीमध्ये बोलत आहेत. तर राजकुमार यांना रेग्युलर हिंदी बोलायची होती. सुभाष घई यांनी याविषयी त्यांना सांगितले नव्हते. ज्यामुळे राजकुमार रागावले आणि सुभाष घईंना सांगितले की, ते चित्रपट सोडून पुन्हा मुंबईत परतणार आहेत. 


- सुभाष यांना राजकुमार यांची समजूत घालण्यास दोन तास लागले होते. ते राजकुमार यांना म्हणाले की, दिलीप कुमार चित्रपटात गरीब कुटूंबातील आहे. तर राजकुमार एका रॉयल कुटूंबातील आहे यामुळे त्यांच्या लहेज्यामध्ये फरक आहे. 

 

विवेक यांच्या बर्थडेला रिलीज झाला होता चित्रपट 

सौदागर चित्रपट ज्या दिवशी रिलीज झाला होता. त्या दिवशी डेब्यू अॅक्टर विवेक मुश्रानचा वाढदिवस होता. विवेकपुर्वी ही भूमिका आमिर खानला ऑफर करण्यात आली होती. ही भूमिका लहान असल्यामुळे आमिरने नकार दिला होता. 
- यासोबतच वासुच्या भूमिकेसाठी चंद्रचूड सिंहनेही ऑडिशन दिली होती. मनीषा कोइरालाच्या भूमिकेसाठी दिव्या भारतीला निवडण्यात आले होते. परंतू कमी वयामुळे दिव्याला रिप्लेस करण्यात आले. 


32 वर्षानंतर दिलीप-राजकुमार आले होते एकत्र 
राजकुमार आणि दिलीप कुमार पैगाम या चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट 1959 मध्ये आला होता. यानंतर कोणत्याही चित्रपटात हे एकत्र दिसले नव्हते. 
- ज्यावेळी सुभाष घईने दिलीप कुमार यांना सांगितले की, राजकुमार तुमच्या मित्राच्या भूमिकेत आहे, तेव्हा ते आपल्या कारमध्ये बसले होते. राजकुमार यांचे नाव सांगताच ते तिथून पळून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...