आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरच्‍या रिंगणात 279 उमेदवारांमध्‍ये रंगणार विधानसभेचा फड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळः मणिपूरमध्‍ये विधानसभा निवडणूक अवघ्‍या 10 दिवसांवर येऊन ठेवली आहे. या निवडणुकीत 279 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यासाठी 11 जानेवारीपर्यंत मुदत होती. तेव्‍हापर्यंत 298 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्‍यापैकी 11 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 8 जणांचे अर्ज अवैध ठरविण्‍यात आले.
निवडणुकीच्‍या रिंगणात आता कॉंग्रेसचे 60, तृणमूल कॉंग्रेसचे 48, मणिपूर स्‍टेट कॉंग्रेस पार्टीचे 31, भाकपचे 24, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे 22, भाजपचे 19 आणि मणिपूर पीपल्‍स पार्टीचे 14, असे एकूण 279 उमेदवार लढणार आहेत. सुरक्षेच्‍या दृष्‍टीने सर्व उमेदवारांना निमलष्‍करी दलामार्फत सुरक्षा पुरविण्‍यात आली आहे. तसेच उमेदवारांना रात्री प्रचार करता येणार नाही. संवेदनशील क्षेत्र तसेच बंडखोरांच्‍या धमक्‍यांमुळे हा निर्णय घेण्‍यात आला आहे.