आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना जमीन महसुलात 28 लाखांची सूट; मराठवाड्यात 10 लाख 72 हजार कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्य सरकारने दुष्काळामध्ये आठ प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये मराठवाड्यात २८ लाख ९५ हजार ८५४ रुपयांची सूट जमीन महसुलात मिळणार आहे. याबाबत मराठवाड्यातून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये कृषिपंपांची थकबाकी असणाऱ्यांची वीज खंडित करू नका, असे आदेश दिले होते. मराठवाड्यात १० लाख ७२ हजार ३८१ कृषी पंपधारकांची संख्या असून त्याच्याकडे ९१८६ कोटींची थकबाकी आहे. 

 

राज्य सरकारने २३ ऑक्टोबरला दुष्काळ घोषित करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३ टक्के सूट तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

 

औरंगाबाद जिल्ह्याला ३ लाख ८५ हजारांची सूट :

औरंगाबाद जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ३ लाख ८५ हजारांची जमीन महसुलात सूट मिळणार आहे. परभणी जिल्ह्यात ४ लाख ४५ हजार, जालना ३ लाख २१ हजार १३०, परभणी ४ लाख ४५ हजार, हिंगोली १ लाख ३ हजार ५२२, नांदेड १ लाख ६५ हजार ७७८, तर बीड जिल्ह्यात ११ लाख ०९ हजार ९१८, लातूर ३ लाख ६५ ५०६, तर उस्मानाबाद ४ लाख ५२ हजार ४१९ रुपयांची सूट मिळणार आहे. 

 

३१ मार्चनंतर होणार पुनर्गठन 
दुष्काळामुळे शेतीच्या कर्जाशी निगडित शेतकरी सभासदांकडून सक्तीची वसुली केली जात नाही, असा अहवाल सहकार विभागाकडून आला आहे. तसेच खरीप हंगाम २०१८ पीक कर्जाच्या परतफेडीचा ३१ मार्चनंतर शेतकऱ्याने संमती दिल्यानंतर पीक कर्जाचे पुनर्गठन होणार आहे, तर कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३ टक्के सूट देण्यात आली आहे. १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी विभागीय मंडळास शाळांनी चलनाद्वारे जमा केली आहे. ही फी सदरील शाळांना परत प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 

 

१० लाख ७२ हजार कृषिपंपांची ९१८६ कोटींची थकबाकी 
टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी थकबाकी वसुलीकरिता खंडित न करण्याचे आदेश संबंधित कार्यालयाला देण्यात आले आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख १८ हजार ६७८ (१७३१ कोटी) जालना १ लाख २३ हजार ७७३ (१७३१ कोटी), बीड १ लाख ७० हजार ८० (१४२० कोटी), लातूर १ लाख २४ हजार २०९ (९८० कोटी) उस्मानाबाद १ लाख २५ हजार ५४३ (११७२ कोटी), हिंगोली ७१६२६ (६४२ कोटी), नांदेड १ लाख २४ हजार ७१४ (११०३ कोटी), परभणी ९३५७८ (९०५ कोटी) इतकी थकबाकी आहे. 

बातम्या आणखी आहेत...